आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू - दोन महिन्यांत तिसऱ्यांदा कर्नाटकच्या निवडणूक दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी शृंगेरी शारदा पीठाचे दर्शन घेतले आणि शंकराचार्यांचीदेखील भेट घेतली. दर्शन करण्यासाठी राहुल यांनी पारंपरिक धोतर परिधान केले होते. यादरम्यान त्यांनी एक जाहीर सभादेखील घेतली. त्यात त्यांनी आजी इंदिरा गांधींना आणीबाणीच्या काळात चिकमंगळूरमधून विजयी झाल्या होत्या याचे स्मरण करून जनतेचे ३९ वर्षांनंतर आभार व्यक्त केले.
इंदिरा गांधी यांनी १९७७ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्यानंतर १९७८ मध्ये चिकमंगळूरमधून निवडणूक लढवली होती व त्या भरघोस मतांनी विजयीदेखील झाल्या होत्या. वास्तविक आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्याविषयी देशभरात त्यांच्याविषयी नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर माझी गरज भासेल. तेव्हा तुमच्यासमोर हजर होईन, अशी ग्वाही त्यांनी जाहीर सभेतून जनतेला दिली. यादरम्यान शृंगेरी मठाचा किस्साही राहुल यांनी सांगितला. आज शृंगेरी मठात दर्शन घेताना येथे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, हे मी पाहिले. तेव्हा मी मुलांना धर्म काय असतो? असे विचारले. सगळ्या मुलांनी सत्यालाच धर्म असे सांगितले. येथील १४ वर्षांच्या मुलासदेखील धर्माचा अर्थ कळतो. मग देशाच्या पंतप्रधानांना धर्माचा अर्थ मात्र समजत नाही. देशाला मोदींकडून प्रेमाची भाषा ऐकायला आवडेल. त्यांच्याकडून तिरस्काराची भाषा अपेक्षित नाही. हीच धर्माची व्याख्या आहे.
तीन दौऱ्यांत राहुल यांचा ८ दिवस कर्नाटकात मुक्काम
कर्नाटकमध्ये राहुल गांधी मवाळ हिंदुत्वासोबत इतर धर्मांवरही लक्ष केंद्रित करून असल्याचे दिसून आले. त्यामुळेच राहुल मंदिरांशिवाय दर्गा आणि चर्चमध्येही जात आहेत. राहुल मंगळवारी मंगळुरूमध्ये रोजारियो चर्चला गेले तसेच उल्लल दर्गावरही त्यांनी चादर चढवली होती. त्याशिवाय उडुपीमध्ये श्री गुरू मंदिरातही ते गेले होते. दोन महिन्यांत कर्नाटकला भेट देण्याची त्यांची ही तिसरी वेळ आहे. या अगोदर तीन-तीन दिवसांच्या दौऱ्यांत दोन वेळा कर्नाटकला आले. ८ दिवसांत ते १४ मंदिरे, तीन दर्गे व दोन चर्चनाही गेले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, उल्लल दर्ग्यावर चादर चढवली....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.