आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांत राम मंदिर बांधा; अन्यथा आंदोलन करू : प्रवीण तोगडिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- अयाेध्येत राम मंदिर बांधकामासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला ४ महिन्यांची मुदत देत आहोत, सरकार या मुदतीत विधेयक आणणार नसेल तर संत समाज लखनऊनहून अयोध्येपर्यंत मोर्चा काढेल, असा इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे(अाहिंप) अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. 


तोगडिया म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बांधकामाबाबत केंद्रातील भाजप सरकारला लोकसभेत विधेयक आणण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देत आहोत, अन्यथा संत समाज ऑक्टोबरमध्ये लखनऊ ते अयोध्यापर्यंत मोर्चा काढेल. त्याआधी तोगडिया यांनी सोमवारी दिल्लीत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. 


विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते तोगडिया यांनी स्पष्ट केले की, २०१४ पूर्वी स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांचे समर्थन करत नव्हते. मात्र, आता भाजप सत्तेत आहे, परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे समर्थन करणार नाहीत. मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, सध्याचे सरकार हिंदुत्ववादी पक्षाचे म्हणून ओळखले जाते. असे असले तरी सरकार २०१४ मध्ये लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले. परिणामी काश्मीरसह राज्यातील अन्य भागात हिंदुहिताची हानी झाली. 


'विदेशात मशिदींना भेटीस वेळ, अयोध्येसाठी नाही' 
पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधकामाबाबत काहीच केले नाही, असा आरोप करत तोगडिया म्हणाले, मोदींकडे अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी वेळही नाही. त्याच वेळी विदेशातील मशिदींना भेट देण्यासाठी तो आहे. अयोध्या, मथुरा व काशीतील मंदिर बांधकामाबाबत कोट्यवधी हिंदूंचा विश्वासघात केला. सरकार अन्य कामांत व्यग्र असल्यामुळे स्वत: विधेयकाचा मसुदा तयार केला . संघटना स्थापनेनंतर तोगडिया प्रथमच अयोध्येला भेट देत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...