आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corruption In Indian Nationals; The Controversial Statement Of Om Prakash Rajbhar

100 काेटी भारतीयांच्या रक्तात भ्रष्टाचार भिनलेला; अाेमप्रकाश राजभर यांचे वादग्रस्त वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारला नेहमीच अाराेपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) अध्यक्ष अाेमप्रकाश राजभर यांनी रविवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले अाहे. १०० काेटी भारतीयांच्या रक्तात भ्रष्टाचार भिनलेला असल्याने त्याविरुद्ध लढा देणे साेपे नाही, असे विधान त्यांनी केले. ते लखनऊ येथे पत्रकारांशी बाेलत हाेते.  


राजभर म्हणाले की, भ्रष्टाचाररूपी दानव लाेकांच्या रक्तात खाेलवर भिनलेला अाहे. तसेच त्याने देशात अापले विक्राळ रूप धारण केले असल्याने या दानवांविराेधात लढणे पाहिजे तेवढे साेपे नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदींचा लाेकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत उड्डाणपुलाचा एक भाग काेसळून नुकत्याच झालेल्या अपघातावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की,  समाजातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यास खूप वेळ लागेल. मात्र, पंतप्रधान माेदी हे या दानवांविराेधात एकटेच लढा देत आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा उल्लेख करत त्यांनी अांध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात व केरळच्या तुलनेत उत्तर प्रदेशात याबाबत स्थिती खूप चांगली असल्याचे म्हटले. मात्र, मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथ व भाजपाध्यक्ष अमित शहा हे अनुसूचित जाती-जमातीच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा अाराेपही राजभर यांनी केला. 

 

लखनऊत अभाविपने जाळला राजभर यांचा पुतळा  

उत्तर प्रदेशातील दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने याेगी सरकारमधील मंत्री अाेमप्रकाश राजभर यांना जबाबदार ठरवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विधानसभेसमाेर त्यांचा पुतळा जाळला. अभाविपचे प्रांत संघटनमंत्री सत्यभान सिंह यांनी सांगितले की, मागासवर्गीय व दलित विद्यार्थ्यांना राजभर यांच्यामुळेच शिष्यवृत्ती मिळत नसल्याची स्थिती अाहे. तसेच डाॅ.शकुंतला मिश्रा विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणही राजभर यांच्यामुळे खराब हाेत असून विद्यापीठाला काही काळापासून पूर्णवेळ कुलगुरू मिळत नसल्याने शिक्षणाचा बाेजवारा उडालेला अाहे.  राजभर यांच्याकडे दिव्यांगांचे मंत्रालय अाहे; परंतु तरीही दिव्यांग नागरिक त्यांच्या अधिकारांपासून वंचित अाहेत.

बातम्या आणखी आहेत...