आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरियार यांच्या पुतळाप्रकरणी सीआरपीएफ जवान अटकेत;घराजवळ पुतळा उभारण्यास विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- तामिळनाडूतील पुडुकाेट्टईत तर्कवादी पेरियार यांचा पुतळा ताेडल्याप्रकरणी केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या (सीअारपीएफ) एका जवानाला अटक करण्यात अाली. एस.सेंथिलकुमार असे या जवानाचे नाव असून, ताे छत्तीसगडमध्ये नियुक्तीला अाहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून ही कारवाई करण्यात अाली.


याबाबत माहिती देताना सीअारपीएफने सांगितले की, सेंथिलकुमार हा १४ मार्चपासून ३० दिवसांच्या सुटीवर अाहे. तसेच त्याला सेवेतून निलंबित करण्यात अाले असून, त्याच्यावर गत १२ फेब्रुवारीपासून हैदराबादेत मानसिक उपचार सुरू अाहेत. दुसरीकडे द्रमुकने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला असता, सेंथिलकुमारने २०१३मध्ये त्याच्या घराजवळ पेरियार यांचा पुतळा उभारण्यास विराेध करून ताे ताेडण्याची धमकी दिली हाेती. तसेच याप्रकरणी त्याला अटक केली असल्याची माहिती मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पाेलिस तपासाचा उल्लेख करून दिली. दरम्यान, यापूर्वी त्रिपुरात लेनिन व तामिळनाडूत पेरियार यांचा पुतळा ताेडल्याच्या घटना घडल्या असून, याप्रकरणी भाजपवर अाराेप करण्यात अाले अाहेत. यासह काेलकात्यातही जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद यांच्या पुतळ्याचे नुकसान केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...