आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dainik Bhaskar Group Launches 'Teen Tack India' Platform For Boys Between 8 And 16 Years

दैनिक भास्कर समूहाने 8 ते 16 वयाेगटातील मुलांसाठी लाँच केले ‘टीन टाॅक इंडिया’ व्यासपीठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाेपाळ - देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह ‘दैनिक भास्कर’ने सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) कार्यक्रमांतर्गत ‘टीन इंडिया टॉक डॉट कॉम’ वेबसाइट लाँच केली आहे. देशातील मुले व तरुणांची भावनिक प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठीचे टीन टॉक इंडिया ही वेबसाइट व्यासपीठ ठरेल.


भारतातील १७ कोटी लोकसंख्या १३ ते १९   वर्षे वयोगटातील अाहे, तर  ६५% लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. म्हणून भारताला  तरुणांचा देश असे म्हटले जाते. मात्र ही पिढी दबावाखाली, तणावात अाहे.  अभ्यासाचा दबाव, पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि इतर सामाजिक कारणे त्यामागे आहेत. अनेकदा हा दबाव तरुणाईला नैराश्याच्या खाईत लाेटताे.  आजही देशातील अनेक भागांत भावनिक आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलले जात नाही. त्याच्याशी निगडित सहायक सेवाही कमीच आहेत.


मुलांतील वाढती नकारात्मकता कमी करण्यासाठी भास्कर समूहाने सकारात्मक पुढाकार घेत टीन टॉक इंडियाचे डिझाइन केले आहे. ही किशोरवयीन मुलांच्या मानसिक व भावनिक आरोग्यावर चर्चा करणारी आहे. तज्ज्ञांनी एकत्र येऊन तिला अशा  सुरक्षित स्पेस रूपात तयार केले आहे जी तरुणांशी निगडित समस्यांना वाचा फोडेल. गुंडगिरी, व्यसनात गुरफटणे, अभ्यासाचा दबाव आणि नैराश्याशी निगडित अडचणींत ही वेबसाइट मदत करेल.

 

तसेच मुले आकलन केल्या जाण्याच्या भीतीतून मुक्त होत स्वत:ला अभिव्यक्त करू शकतील. सहा महिन्यांत आम्ही विविध शहरांत सेमिनार घेतले, त्यातून चांगल्या प्रतिक्रिया अाल्या. आमच्या इन-हाऊस टीममध्ये किशोरवयीनांच्या प्रकरणांशी संबंधित पर्सनल समुपदेशक व तज्ज्ञांचा समावेश आहे. तसेच आम्ही फोर्टिस हेल्पलाइन, वांद्रेवाला फाउंडेशनसारख्या उत्तम सपोर्ट सर्व्हिसशीही जुळलेलो आहोत. आम्ही तुमच्या मुलांच्या मदतीसाठी टीन टॉक इंडिया डॉट कॉम या वेबसाइटवर जाण्याचा सल्ला देत आहोत.

 

वेबसाइट-  www.teentalkindia.com

बातम्या आणखी आहेत...