आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 एप्रिलनंतर अत्याचार वाढले! दलित खासदार उदित राज यांचा भाजपला घरचा आहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश- अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशभरात हिंसाचार उसळला यामुळे भारतीय जनता पक्षातील खासदार स्वत:च्याच पक्षावर नाराज आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा मोठा दलित चेहरा म्हणून ओळखल्या जाणा-या उदित राज यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. भारत बंदच्या दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनानंतर देशात दलित समाजाच्या सदस्यांवर अत्याचार होत आहेत असं उदित राज म्हणाले आहेत.

 

ट्विटरद्वारे उदित राज यांनी म्हटले आहे की, दोन एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात सहभागी होणा-या दलितांवर अत्याचाराच्या बातम्या येत आहेत, पण हे थांबायला हवे. दोन एप्रिलनंतर देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. केवळ आरक्षणविरोधी लोकंच नाही तर पोलीस देखील मारहाण करीत आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवले जात आहे, असे देखील उदित राज यांनी म्हटले आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा खासदार उदित राज यांनी केलेले ट्विट...

बातम्या आणखी आहेत...