आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Affair : 2 महिन्यांपूर्वी केली मुलीची हत्या, आता नाल्यात आढळला पोलिस पित्याचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहाजहाँपूर (UP) - येथे एका पोलिसाचा मृतदेह सापडल्याने एकच गदारोळ माजला आहे. असे सांगितले जात आहे की, हत्या करून या व्यक्तीचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला आहे. मृत मेहरबान अली पोलिस वायरलेस ऑफिसमध्ये तैनात होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलीची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे कुंटुंबाने अली यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पोलिस तपास करत आहेत. 


मेहरबान अली यांचा मृतदेह नाल्यात तर बाजुला त्यांची बाईक पडलेली होती. त्यांच्या शरिरावर काही जखमाही आढळून आल्या. अली यांची मुलगी सना हिची 7 एप्रिलला हत्या केली होती. सुत्रांच्या मते अली यांच्या हत्येचा संबंध मुलीच्या हत्येशी असू शकतो. कारण अली यांच्या मोठ्या मुलीशी अरशदचे अफेयर सुरू होते. पण त्याला तिची लहान बहीण आवडली. त्यामुळे त्याने मोठ्या बहिणीला गोळ्या घातल्या होत्या. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...