आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या सरकारने लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट दिले नाही, आम्ही दिले : पंतप्रधान मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी चेन्नईजवळील महाबलीपुरममध्ये १० व्या डिफेन्स एक्स्पोत संरक्षण प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यांनी लष्कराची कवायतही पाहिली. याप्रसंगी मोदी म्हणाले की, या प्रदर्शनात ५०० पेक्षा जास्त देशी आणि १५० पेक्षा जास्त विदेशी कंपन्या हजर आहेत. ४० पेक्षा जास्त देशांनी आपले प्रतिनिधी पाठवले आहेत याचा आनंद वाटतो. आमचे सरकार शांततेसाठी जेवढे प्रतिबद्ध आहे तेवढेच आम्ही आपले लोक आणि देशाच्या संरक्षणासाठीही तत्पर आहोत. त्यासाठी आम्ही आपल्या सुरक्षा दलांना हरप्रकारे सक्षम करण्यास तत्पर आहोत. गेल्या काही वर्षांत सरकारने शस्त्रास्त्र निर्मितीबाबत बरेच काम केले आहे. त्यात संरक्षण निर्मितीचे परवाने देणे, एफडीआय, निर्यात यांचा समावेश आहे. सरकारने संरक्षण अधिग्रहणाच्या प्रक्रियेचेही नूतनीकरण केले आहेे. हे प्रदर्शन १४ एप्रिलपर्यंत चालेल. यंदा त्याची संकल्पना ‘भारत: उगवती संरक्षण बाजारपेठ’ अशी आहे.  तत्पूर्वी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींनी मोदींचे विमानतळावर स्वागत केले. 

 

 

मोदींनी काँग्रेस सरकारवर साधला निशाणा   
मोदींनी लष्करासाठी शस्त्रास्त्रे आणि साहित्य खरेदीत विलंबासाठी मागील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लष्करासाठी बुलेटप्रूफ जॅकेट्सची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती हे तुम्ही पाहिलेच असेल. आम्ही आता ती मान्य केली आहे. आमच्या सरकारने सशस्त्र दलांच्या तत्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर निर्णय घेतलेच शिवाय ११० लढाऊ विमानांसाठी नवा करारही केला आहे.   

 

 

भारतात तयार होईल समुद्र आणि नदीतून उड्डाण करणारे अमेरिकी विमान   

 

समुद्र आणि नदीतून टेक ऑफ आणि लँडिंग करणारे विशेष मानवरहित विमान आता भारतातही तयार होईल. हा मेक इन इंडिया धोरणाचा भाग असेल. बुधवारी चेन्नईत डिफेन्स एक्स्पोदरम्यान महिंद्रा ग्रुपने संयुक्त करारांतर्गत अशी विमान बनवण्याची घोषणा केली. महिंद्राने जपानच्या शिनमायवा इंडस्ट्रीज लिमिटेडसाेबत हा करार केला आहे. त्यात देशातच जमीन आणि पाण्यातून उड्डाणास सक्षम असणाऱ्या यूएस-२ ची निर्मिती केली जाईल.   

 

- यूएस-२ तीन मीटर उंच समुद्र लाटांतही कारवाई करू शकेल.   

- महिंद्रा विमानांचे मेंटेनन्स, ओव्हरहॉलिंग युनिट्सही स्थापन करेल.   
- महिंद्राने इस्रायली कंपनी एअरोनॉटिक्ससोबतही करार केला आहे.   

 

कावेरी वाद : चेन्नईत ‘मोदी गो बॅक’च्या घोषणा   

चेन्नई विमानतळावरून निघताना पंतप्रधान मोदींना निदर्शकांनी कावेरी पाणी वाटपावरून काळे झेंडे दाखवले. लोकांनी काळे फुगेही उडवले. त्यावर ‘मोदी गो बॅक’ अशी घोषणा होती. माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधींनीही मोदींच्या दौऱ्याविरोधात काळे कपडे घातले.   

बातम्या आणखी आहेत...