आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचाराला विकास हेच उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलई (छत्तीसगड) - हिंसाचाराला विकास हेच उत्तर ठरेल. म्हणूनच शांतता, स्थैर्य व पायाभूत सुविधा असल्यास विकास साध्य होतो. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये अशाच प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.    


पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी २२ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद््घाटन करण्यात आले. त्याचे प्रत्यक्ष काम निवडणुकीनंतर सुरू होणार आहे. उद््घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांनी भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. केंद्र तसेच राज्य सरकारने छत्तीसगडमध्ये विश्वास जिंकण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. म्हणूनच आता नक्षलग्रस्त भागातील हिंसाचारासाठी विकासातून उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यातून हिंसाचार आणि कटकारस्थानेदेखील संपू लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्वास निर्माण होईल, असे वातावरण हे सरकारसमोरील मोठे आव्हान होते. परंतु त्यात सरकारला यश मिळाले आहे. नैसर्गिक स्रोतांच्या साह्याने स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उदाहरण खनिजाचे देता येऊ शकेल. त्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. आदिवासी समुदायाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मोदी यांचा दोन महिन्यांतील हा दुसरा छत्तीसगड दौरा आहे. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधला. 

 

३ हजार कोटी अतिरिक्त निधी    
छत्तीसगडला अतिरिक्त ३ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हा निधी रुग्णालये, शाळा, रस्ते व स्वच्छतागृहांच्या निर्मितीवर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील दुर्गम व मागास भागातील पायाभूत सुविधांत वाढ होऊन विकासाचा मार्ग प्रशस्त होईल. रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.   

 

एकीकृत नियंत्रण केंद्राचे उद््घाटन :

नया रायपूर भारतातील इतर शहरांसाठी पथदर्शक स्मार्ट सिटी म्हणून लौकिक मिळवेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते गुरुवारी एकीकृत नियंत्रण केंद्राचे उद््घाटन झाले. पूर्वी रायपूरची आेळख बाँब व बंदुकांसाठी होती. आता विमानतळ ही नवीन आेळख असेल. मोदींच्या हस्ते भिलई स्टील प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. कच्छ ते कटक, कारगिल ते कन्याकुमारी असो. स्वातंत्र्योत्तर काळात भिलई स्टील प्रकल्पातून भारतीय रेल्वेला पोलाद पुरवठा केला जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.    

 

दर दिवशी ५० फ्लाइट    
सध्या रायपूर विमानतळावर दर दिवशी ६ विमान उड्डाणांची परवानगी आहे. परंतु ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. लवकरच रायपूर विमानतळावर दर दिवशी ५० विमान उड्डाणांचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा विकसित झाल्याचे पाहायला मिळेल. मागील संपुआ सरकारने छत्तीसगडच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. संपुआ सरकारने राज्याच्या आयआयटी संस्थेच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले होते. परंतु रालाेआ सरकारने आयआयटी-भिलईच्या रूपाने राज्याची इच्छा पूर्ण केली आहे, असे मोदी यांनी सांगितले.   

बातम्या आणखी आहेत...