आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhongi Baba Rapes 120 Women In The Name Of Religion Caught Because Of A Video Went Viral

आणखी एक बलात्कारी बाबा अटकेत, एक-दोन नव्हे तर 120 महिलांवर Rape, व्हिडिओ व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फतेहाबाद (हरियाणा) - येथील टोहनामधून पोलिसांनी बाबा अमरपुरी उर्फ बिल्लू या 60 वर्षीय भोंदूबाबाला अटक केली आहे. बाबाने केलेल्या बलात्काराचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने बाबाला अटक केली. त्यानंतर त्याच्या आश्रमाच्या झडतीमध्ये काही धक्कादायक पुरावे पोलिसांना मिळाले. पोलिसांना वेगवेगळ्या पीडितांच्या जवळपास 120 क्लिप्स सापडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडिओचा वापर करून वारंवार बलात्कार करण्यासाठी बाबा या व्हिडिओजचा वापर करायची अशीही माहिती मिळाली आहे. 


अमरपुरी याने त्याला अटक होण्याच्या एका दिवसाआधीच म्हणजे शुक्रवारीच एक बलात्कार केला होता, अशी माहितीही मिळाली आहे. बाबा ज्या मंदिरात नियुक्त होता, त्याठिकाणीही पोलिसांनी छापा मारला, त्यात पोलिसांना अनेक संशयास्पद वस्तू आढळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

असा करायचा बलात्कार..
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमरपुरी हा अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांना त्याच्या जाळ्यात ओढायचा. भूत उतरवण्याच्या नावाखाली तो महिलांना फसवत होता. तंत्र - मंत्रचा बहाणा करून बाबा महिलांना गुंगीचे औषध द्यायचा. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या महिलांवर तो बलात्कार करायचा. त्याचा व्हिडिओ त्यार करून तो महिलांना ब्लॅकमेल करायचा. महिलांकडून पैसे उकळण्याबरोबरच तो धमकी देऊन वारंवार त्यांच्यारव बलात्कारही करायचा. 


5 दिवसांची कोठडी 
पोलिसांनी या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाचा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. आरोपी अमरपुरीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी अमरपुरीने अत्याचार केलेल्या पीडित महिलांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचे आव्हान केले आहे. तक्रार दाखल करणाऱ्या महिलांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असेही पोलिस म्हणाले आहेत. नातेवाईकांनाही याबाबत माहिती दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 


9 महिन्यांपूर्वीही झाली होती तक्रार दाखल 
अमरपुरी याच्या विरोधात 9 महिन्यांपूर्वीही बलात्काराची एक तक्रार दाखल करण्यात आली होती. बलात्काराच्या या प्रकरणातही पोलिसांनी अमरपुरी याला अटक केली होती. पण नंतर तो जामीनावर सुटला होता. 


 

 

बातम्या आणखी आहेत...