आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्ये बजेटवरून मतभेद; सिद्धरामय्या यांना भेटले ९ आमदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत फूट पडत असल्याचे चित्र दिसत आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची नाराजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींना भोवण्याची शक्यता आहे. ५ जुलैला येणाऱ्या अर्थसंकल्पाआधीच कुमारस्वामींचे सरकार पडू शकते, अशी चर्चा आहे. बुधवारी काँग्रेसच्या एका मंत्र्यासह ९ आमदार सिद्धरामय्या यांना भेटण्यास बेलतानगडीला पोहोचले. 


सिद्धरामय्या यांच्या भूमिकेमुळे आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल झाल्याचे दिसू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. कारण गेल्या काही दिवसांत सिद्धरामय्या सतत कुमारस्वामींच्या विरोधात असंतोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या आमदारांत नाराजी वाढत आहे. सिद्धरामय्या जेडीएस-काँग्रेस समन्वय समितीचे अध्यक्षही आहेत. दुसरीकडे, सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...