आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रुग्‍णांना रेल्‍वे तिकिटावर मिळते 100% सूट, ACमध्‍येही करू शकता प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय रेल्‍वेतर्फे काही विशेष लोकांसाठी विशेष योजना राबवल्‍या जातात. यामध्‍ये वृद्ध, आजारी, दिव्‍यांगसह 13 प्रकारच्‍या लोकांचा समावेश आहे. यातील एक खास योजना रूग्‍णांसाठीही आहे. या योजनेअंतर्गत रुग्‍ण आपल्‍या उपचारासाठी रेल्‍वेने अगदी मोफत प्रवास करू शकतात. त्‍यांना शंभर टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्‍यात येते. रुग्‍णांसोबत एका प्रवासीलाही तिकिटात सुट देण्‍यात येते. मात्र ही सुविधा काही आजारांच्‍या रूग्‍णासाठीच आहे. चला तर जाणून घेऊया, या सुविधेचा लाभ कोणकोणते रुग्‍ण घेऊ शकतात. 

 

कँसर रूग्‍ण 
कँसर रूग्‍णाला चेकअपसाठी वांरवार प्रवास करावा लागतो. म्‍हणून रेल्‍वेतर्फे त्‍यांना व त्‍यांच्‍यासोबत असणा-या प्रवाशाला तिकिटामध्‍ये विशेष सुट दिली जाते. या रुग्‍णांना रेल्‍वेच्‍या सेकंड, फर्स्‍ट क्‍लास आणि एसी चेअर कारमध्‍ये प्रवासासाठी 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली जाते. तर स्‍लीपर, 3एसीमधील प्रवासासाठी 100 टक्‍के आणि 1एसी व 2 एसीमधील प्रवासासाठी 50 टक्‍क्‍यांपर्यंत सुट दिली जाते. 

 

थैलेसीमिया, ह्रदय आणि किडनीचे रूग्‍ण 
थैलेसीमिया हा एक अनुंवाशिक आजार आहे. या आजारामुळे शरीरात हिमोग्‍लोबीनची निर्मिती होत नाही. यामुळे त्‍याला वांरवार रक्‍त पुरवावे लागते. या रुग्‍णांना चेकअपसाठी रेल्‍वे प्रवासात सुट दिली जाते. तर ह्रदयविकाराने पिडित रुग्‍णांना हार्ट सर्जरीसाठी तर किडनी पेंशट्सना किडनी ट्रान्‍सप्‍लांटच्‍या ऑपरेशनसाठी किंवा डायलिसिससाठी तिकिटात सुट दिली जाते. ती अशाप्रकारे असते- 
- सेकंड क्‍लास, स्‍लीपर, फर्स्‍ट क्‍लास, 3एसी, एसीमधील प्रवासासाठी 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट 
- 1एसी आणि 2 एसी साठी 50 टक्‍के सूट. 

 

हीमोफीलिया पेशंट्स 
या आजारामध्‍ये रुग्‍णाच्‍या रक्‍ताचे गोठणे बंद होते. त्‍यामुळे या रुग्‍णाला जखम झाल्‍यास त्‍याचे फार रक्‍त वाहते. यामुळे त्‍याचा जीवही जाऊ शकतो. या रुग्‍णांना चेकअपसाठी सेकंड, स्‍लीपर, फर्स्‍ट क्‍लास, 3एसी, एसीमधील प्रवासासाठी 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळते. त्‍यासोबत प्रवास करणा-या एका प्रवाशालाही ही सूट देण्‍यात येते. 


पुढील स्‍लाइडवर वाचा, टीबी आणि एड्स पेशेंटही यादीत... 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...