आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटाच्या सीमा यांनी जिंकले 1 किलो सोन्याचे दागिने, तर भोपाळच्या मीनाला मर्सिडीझ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- दैनिक भास्कर समूहाची वर्तमानपत्र जगतातील आजवरची सर्वात भव्य ‘जिंका १५ कोटी बक्षीस योजना’च्या लकी ड्रॉचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात कोटा येथील (राजस्थान) सीमा सुमन यांनी १ किलो सुवर्ण अलंकार जिंकले आहेत. अहमदाबादच्या बिपिन रामचंद्र व्यास व भोपाळच्या मीना श्रीवास्तव मर्सिडीझ बेंझ कारच्या विजेत्या ठरल्या. अहमदाबादच्याच अरुण बी. परमार यांनी युरोप टूरचे बक्षीस जिंकले. योजनेच्या इतर विजेत्यांच्या  नावांची घोषणा ‘दिव्य मराठी’च्या आगामी अंकांत केली जाईल.


बुधवारी अहमदाबादच्या भास्कर हाऊसमध्ये निवृत्त न्यायाधीश जे.के. आचार्य, अभिनेते नरेश कनोडिया, गुजरात तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू नवीन सेठ, सीए सुनील तलाटी, आमदार भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत लकी ड्राॅ काढला गेला. ‘जिंका १५ कोटी’ योजनेत  देशभरातील हजारो शहरांतून लाखो वाचकांनी भाग घेतला. त्यांच्या प्रवेशिका सॉफ्टवेअरद्वारे कॉम्प्युटरमध्ये पंच केल्यानंतर लकी ड्रॉ काढला. यादरम्यान भास्करच्या वरिष्ठ व्यवस्थापन टीमचे सदस्य प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंग हरीश भाटिया, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट विनय माहेश्वरी व दिव्य भास्कर गुजरातचे सीओओ अमित दोशी उपस्थित होते. 

 

आनंद कसा व्यक्त करावा हेच कळेनासे झाले : सीमा 
मी माहेरी आलेले असतानाच दैनिक भास्करच्या ड्रॉमध्ये एक किलो सोन्याचे दागिने जिंकल्याचे कळले. मी इतके मोठे बक्षीस जिंकले आहे, यावर विश्वासच बसेना. आनंद कसा व्यक्त करावा, हेही कळेनासे झाले आहे. आजचा दिवस आयुष्यातील सर्वात अमूल्य व संस्मरणीय ठरला आहे. - सीमा सुमन, सुवर्णालंकारांच्या विजेत्या
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, माझ्या कुटुंबासाठी सर्वात चांगला दिवस- बिपिन व्यास, मर्सिडीझ कारचे विजेता
बातम्या आणखी आहेत...