आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर पत्नीवर जडले प्रेम, गर्लफ्रेंडची हत्या करून बेडमध्ये लपवला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली येथील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये फिजियोथेरेपिस्ट ट्रेनिंग करणाऱ्या एका व्यक्तीने फेसबुकवरून मारिया नावाच्या तरूणीशी मैत्री केली. पाहता पाहता मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एक दिवस या प्रेमाची हत्या करण्यात आली. तुगलकाबाद पोलिसांनी आरोपी फिजयोथेरेपिस्ट सुरेशला उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याने आपल्या जबाबात तरूणीची हत्या केली असल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी सुरेशची रवानगी जेलमध्ये केली आहे.


डेप्यूटी पोलिस कमिश्नर चिन्मय बिस्वालनुसार, पोलिसांनी रवीवारी तुगलकाबाद येथील एका घरातील बेडमधून एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला होता.  महिलेची ओळख उत्तराखंड येथील मारिया उर्फ सावित्री मेहरा अशी झाली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


- तपासादरम्यान कळाले की महिला उत्तराखंड येथील सुरेश सोबत राहत होती. दोघांनी लव मॅरेज केले होते.
- पोलिासंनी सुरेशच्या घरी उत्तराखंड येथे पोहोचून तपासणी केली तेव्हा तेथे सुरेशची आणखी एक पत्नी असल्याचे पोलिसांना कळाले आणि तिच्यासाठी सुरेश उत्तराखंड येथे आला होता.


पोलिसांनी तीन दिवस पाहिली वाट...
- सुरेश उत्तरखंड येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तुगलकाबाद पोलिासंनी उत्तराखंड येथे जाऊन सलग तीन दिवस सुरेशच्या घराजवळ त्याची वाट पाहिली.
- तीन दिवसांनंतर जेव्हा सुरेश रात्री उशीरा आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याची वाट पाहत असणाऱ्या पोलिसांनी त्याला अटक केली.
- आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याची आणि मारियाची मैत्री फेसबुकवरून झाली होती. दोघे लिव इन रिलेशिपमध्ये राहत होते. या दरम्यान सुरेशला काही कामासाठी उत्तराखंड येथे यावे लागले. येथे त्याच्या नातेवाईकांनी त्याचे जबरदस्ती लग्न लावून दिले.
- लग्नानंतर सुरेश पत्नीला घरी सोडून दिल्लीमध्ये आला. दिल्लीमध्ये मारियाला फेसबुकवरून त्याच्या लग्नाची माहिती दिली, तेव्हा तिनेही सुरेशवर लग्न करण्यास दबाव टाकण्यास सुरूवात केली.


धर्म बदलून केले लग्न आणि झाली हत्या...
- मारियाने दबाव टाकल्यानंतर सुरेश लग्नास तयार झाला. मारियाने हिंदू धर्माचा स्विकार करून सुरेशशी लग्न केले.
- मारियाशी लग्नाची माहिती मिळाल्यानंतर उत्तराखंड येथील त्याची पत्नी त्याला परत बोलवून घेण्यासाठी सुरेशवर दबाव टाकू लागली, तर मारिया त्याला आपल्या सोबत ठेवण्यासाठी दबाव टाकत होती.
- दोन्ही पत्नींमुळे त्रस्त होऊन सुरेशने मारियाची हत्या करण्याचा कट रचला आणि उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली आणि तिला तसेच बेडवर सोडून फरार झाला.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...