आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक शेताचा असेल यूआयडी क्रमांक; नेटवर टाकताच समजेल खताची गरज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- पंजाबमध्ये प्रथमच प्रत्येक शेतासाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (यूआयडी) असेल. शेतकऱ्याने इंटरनेटवर यूआयडी टाकल्यानंतर त्याच्या शेताच्या मातीत कोणते घटक कमी आहेत व त्याची पूर्तता करण्यासाठी कोणते खत किती प्रमाणात वापरावे याची माहिती मिळेल. यामुळे कीटकनाशके व खताचा बेसुमार वापर थांबेल, असा कृषी विभागाचा दावा आहे. भाज्या व धान्यात रसायनाचे प्रमाण कमी होईल. कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येतही घट येईल. म्हणजे यूआयडी कॅन्सर रोखण्यासाठी एक साधन होऊ शकतो.  


पंजाबच्या मालवा भागात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथून निघणाऱ्या रेल्वेचे नाव कॅन्सर ट्रेन ठेवण्यात आले आहे. देशात एक हेक्टर जमिनीवर सरासरी ९० किलो युरिया खत वापरले जाते, तर पंजाबात एका पिकासाठी सरासरी १८५ किलो युरिया खत वापरतात. यामुळे हवामान दूषित होते तसेच शेतकऱ्यांच्या खर्चातही वाढ होते. यासाठी कृषी विभागाने सॅटेलाइटद्वारे लिंक ग्रीड तंत्रज्ञान वापरून जमिनीचा नकाशा तयार केला आहे.  आता सर्व शेतातील मातीचे नमुने घेतले जात आहेत.  मातीच्या तपासणीसाठी सरकारी शाळांमधील प्रयोगशाळांची मदत घेतली जाणार आहे. मातीचे परीक्षण करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. 

 

असे सुरू आहे काम  
सरकारने प्रत्येक शेतातून मातीचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू केले. एकदा नमुने घेतल्यानंतर ३ वर्षांपर्यंत शेतात कोणते घटक कमी आहेत, याची माहिती मिळते. शेणापासून तयार झालेल्या खताचाही वापर करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल. यामुळे शेतात कोणत्या घटकांची कमतरता आहे?  याची अचूक माहिती मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...