आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातही आहे 2340 वर्षे जुनी महिलेची ममी, असे वाटते आताच झालाय मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - 2 हजार 340 वर्षांनंतरही एका विशेष प्रकारच्या लेपासोबत जयपूरच्या अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेली इजिप्तची ममी पूर्वीसारखीच सुस्थितीत आढळली आहे. येथे अंधुक प्रकाश आणि खास सुरक्षा उपकरणांद्वारे जतन केलेली ‘इजिप्शियन ममी’ पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक येतात. हे कदाचित भारतातील असे पहिलेच म्युझियम आहे, जे रात्रीही सुरू असते. दिल्ली नॅशनल म्यूझियमच्या पुढाकाराने इजिप्तच्या ममी विशेषज्ञ रानिया अहमद आणि नॅशनल म्युझियममधून आलेले रसायन विभागाचे अमल कांत पाठक यांनी अडीच तास तपासणी करून ही माहिती दिली. विभागाचे एसीएस सुबोध अग्रवाल म्हणाले की, टीमने ममीची परिस्थिती चांगली असल्याचे सांगत एकूण देखभालीचेही कौतुक केले आहे. यापूर्वी मार्च 2011 मध्ये राज्य सरकारच्या विशेष निमंत्रणावरून इजिप्तच्या 3 जणांच्या टीमने या ममीचे निरीक्षण करून एक्स-रे घेतले होते.


मृतदेहात मसाला लावण्यासाठी कैरो म्युझियममधून येतात तज्ज्ञ
- या ममीची वेळोवेळी देखभाल केली जाते.
- ही देखभाल राज्य पुरातत्त्व विभागाच्या केमिकल डिव्हिजनचे लोक करतात.
- तसेच हे काम इजिप्तच्या कैरो म्यूझियमच्या तज्ज्ञांच्या निर्देशानुसार होते.
- सन 1999 आणि 2011 मध्ये इजिप्तहून एक दल जयपूरला आले होते. त्याने या ममीचा एक्स-रे करून रासायनिक उपचार केले. 

 

असे वाटते की, जणू काही नुकताच झाला आहे मृत्यू
- अल्बर्ट म्युझियममध्ये हजारो वर्षे जुन्या डेडबॉडीवर मसाला लावून तिला जतन करण्यात आले आहे.
- अल्बर्ट हॉलच्या मधोमध हा निष्प्राण देह आजही असा दिसतो की, जणू काही नुकताच मृत्यू झाला असून त्याचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले आहे.
- येथे रोज शेकडो पर्यटक येतात. आणि येथे ठेवलेल्या पुरातन वस्तू पाहून हरखून जातात.

देशात 6 ममी, टीमने 5 चे केले निरीक्षण
- देशातील 6 शहरांत कोलकाता, लखनऊ, मुंबई, हैदराबाद, जयपूर आणि बडोदा म्यूझियममध्ये ममी ठेवलेल्या आहेत.
- इजिप्तच्या तज्ज्ञांनी बडोदाशिवाय 5 शहरांना भेट दिलेली आहे.
- यात लखनऊतील ममी क्षतिग्रस्त आढळली, तर जयपूरमधील ममी सर्वात चांगल्या अवस्थेत आढळली आहे.
- सध्या दिल्लीत त्यांच्या संरक्षणावरून पुढची प्लॅनिंग केली जात आहे.

 

अल्बर्ट म्युझियम जयपूरमध्ये अशी आली ममी
- इजिप्तची ही ममी 1887 मध्ये आणण्यात आली होती आणि 1980 मध्ये अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली. ही ममी तूतू नामक महिलेचा संरक्षित देह आहे, ती इजिप्तचे प्राचीन राज्य (पॅनोपोलिस) अखमीनमध्ये मिळाली होती.
- ही महिला खेम नामक देवाचे उपासक पुरोहितांच्या परिवाराची सदस्या होती. इजिप्तच्या मान्यतेनुसार शरीराला या प्रकारे संरक्षित करण्याचे कारण आत्माचा शरीरात पुन्हा प्रवेश व्हावा असे आहे.
- यासाठी सर्व अवयव काढून प्रिझर्व्ह केले जातात. डिहाइड्रेट करून पट्ट्या बांधून बिटुमिनची लेअर लावली जाते. विशेष प्रकारचे लेप असायचे.

बातम्या आणखी आहेत...