आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदच्या नमाजनंतर काश्मिरात 5 जिल्ह्यांत चकमक, तरुणाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरमध्ये ईदच्या नमाजनंतर निदर्शकांनी जवानांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. - Divya Marathi
श्रीनगरमध्ये ईदच्या नमाजनंतर निदर्शकांनी जवानांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

श्रीनगर - काश्मीरमध्ये ईदच्या दिवशीही निदर्शकांनी लष्कर, सुरक्षा दलांवर  दगडफेक केली. पाच जिल्ह्यांत चकमकीत ४० लोक जखमी झाले. अनंतनागमध्ये एक तरुण ठार झाला. शनिवारी पाक लष्कराच्या गोळीबारात राजौरीतील नियंत्रण रेषेवर मणिपूरमधील रायफलमॅन बिकास गुरुंग (२१) शहीद झाला. तर शहीद जवान औरंगजेबवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. ताणलेल्या संबंधांचा परिणाम अटारी बॉर्डवर दिसून अाला. यंदा बीएसएफ आणि पाक रेंजर्सनी एकमेकांना मिठाई दिली नाही.

 

अफगाणिस्तानमध्ये १७ वर्षांत पहिल्यांदाच  तालिबान अतिरेकी आणि लष्कराने एकत्रित ईद साजरी केली. जवान आणि अतिरेक्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. दरम्यान, नांगरहार प्रांतात आत्मघाती हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला. मृतांत लष्करी जवान, अतिरेकी व नागरिक आहेत. 

 

 

 

शेवटच्या स्लाइडवर पाहा, आझादीच्या घोषणा देणाऱ्या महिला आणि दगडफेक करणारे काश्मीरी युवक

 

बातम्या आणखी आहेत...