आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात २० किमी पायपीट करत अाठ नक्षलींना टिपले, मृतांत ४ महिला; छत्तीसगड पोलिसांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगदलपूर/दंतेवाडा- छत्तीसगड पोलिसांनी गुरुवारी बिजापुरात चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. संयुक्त पोलिस दलाचे जवान दंतेवाडाहून बिजापूरच्या सीमेत २० किमी आतमध्ये जंगलात पायी गेले. तेथे सुनियोजित पद्धतीने नक्षलींचे एन्काउंटर केले. राज्य पोलिसांनी नक्षलींविरुद्ध इतकी मोठी मोहीम पूर्णपणे यशस्वी केल्याची ही पहिलीच वेळ आहे. 


नक्षल म्होरक्या गणेश उइके आणि नक्षलींच्या मिलिटरी कंपनी नंबर २ च्या मोठ्या नक्षली नेत्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. तथापि, चकमकीदरम्यान नक्षलवादी आपल्या बड्या नेत्यांनाच वाचवून पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. मृत नक्षलींत ४ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून २ इन्सास रायफली, दोन रायफली आदींसह माेठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके सापडली आहेत. 

बातम्या आणखी आहेत...