आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअर तरुणाने ठोकरला 20 लाखांचा हुंडा, नकार देऊन असे केले आदर्श लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेतिया (बिहार) - शनिवारी रात्री शहराच्या एका खासगी मंगल कार्यालयात रोहित राज या सिव्हिल इंजिनिअर तरुणाने 20 लाख रुपये हुंडा ठोकरून दीपिका सिन्हा या तरुणीशी लग्न केले. रोहित देवघरमध्ये सिव्हिल इंजीनियर आहे, तर दीपिकाने मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतलेले आहे.

 

इंजीनियर बनल्यावर मिळाली होती लाखो हुंड्याची ऑफर
- रोहितच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी सांगितले की, रोहित इंजिनिअर बनताच त्याला लग्नासाठी स्थळे येऊ लागली होती. त्याला आपला जावई करण्यासाठी बोली लागायला लागली होती.
- एक सदगृहस्थाने तर 20 लाख हुंड्याची ऑफर दिली होती. परंतु हुंडाबंदीच्या असलेल्या जनजागृतीमुळे कुटुंबाचे मनपरिवर्तन झालेले होते. 
- रोहितचे वडील संजीव रंजन वर्मा म्हणाले की, रोहित माझा मोठा मुलगा असून रोहित लहान मुलाचे नाव मोहित आहे. मोहित हायकोर्टात वकील आहे. मला मुलगी नाही. म्हणून मी संकल्प केला आहे की, सुनांनाच मुलीच्या रूपात घरी आणणार आहे.

 

नवरीच्या वडिलांनी स्वखुशीने वऱ्हाडी मंडळींची चोख व्यवस्था केली
- जमुईची रहिवासी दीपिकाचे वडील पवन कुमार पंकज म्हणाले की, ते जमशेदपूरमध्ये एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांना एक मुलगा आहे जो बंगळुरूत इंजिनिअर आहे. आणि एक मुलगी आहे दीपिका.
- जेव्हा लग्नाची बोलणी सुरू होती तेव्हा वरपक्षाच्या मंडळींनी हुंडा नाकारला. म्हणून मी वऱ्हाडी मंडळींची जेवण्या-खाण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली. एवढे चांगले स्थळ आल्याने मी स्वखुशीने वऱ्हाडी मंडळींना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली. मला असा जावई आणि असे सासर माझ्या मुलीला मिळाल्याने खूप आनंदात आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या आदर्श लग्नाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...