आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदभाव-भयमुक्त प्रशासन म्हणजे रामराज्य- नायडू; उत्तर प्रदेश दिनानिमित्त मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- भेदभाव, भ्रष्टाचार, भयमुक्त प्रशासन म्हणजे रामराज्य होय. भगवान रामाला कोणत्याही धर्माला जोडणे योग्य नाही. श्रीरामाकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले पाहिजे. म्हणूनच रामराज्य आणण्यासाठी सर्वांनी अगोदर जातपात, धर्म किंवा राजकीय संकुचितपणा सोडला पाहिजे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.  


हिंदुत्व हा काही धर्म नाही. ती एक जीवन पद्धती आहे. त्यामुळेच भारताला ‘हिंदुस्थान’ म्हटले जाते. रामराज्य भयमुक्त, भ्रष्टाचार आणि भेदभावमुक्त आहे. कोणत्याही व्यक्तीशी जात-धर्म, राजकारण यातून भेदभावाची वागणूक मुळीच अपेक्षित नाही. त्यामुळे ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. आपापले धर्माचरण करतानाच या देशात परस्परांत बंधुभाव पाहायला मिळतो. जात-धर्मावरून एखाद्यावर हल्ला करणे योग्य नाही, असे नायडू यांनी सांगितले.  देशासाठी सुशासन व विकास जास्त महत्त्वाचा आहे याचा नागरिक म्हणून विसर पडता कामा नये, असे नायडू यांनी म्हटले.  बुधवारी उत्तर प्रदेश दिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यासह इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती.  

 

‘स्थैर्यासाठी शांतता- सुव्यवस्था हवी’  
देशाचा विकास करायचे असेल किंवा स्थिर सरकारसाठी शांतता-सुव्यवस्थेची गरज असते. त्यामुळे आपण संकुचित राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. ब्रिटिशपूर्व काळात सकल घरेलू उत्पादन २७ टक्के होते. मात्र, आता आपण ७ किंवा ७.५ टक्क्यांवर चर्चा करू लागलो आहोत. ही परिस्थिती केवळ अंतर्गत संघर्षातून उद््भवली आहे. भारतीयांनी नेहमी ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. आपण आपल्या परंपरा सांभाळल्या पाहिजेत.

बातम्या आणखी आहेत...