आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी 3 महिन्यांच्या बाळाचे केले ऑपरेशन, पोटातून निघाले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 महिन्यांच्या बाळाच्या पोटातून निघाले 450 ग्रॅमचे भ्रूण. - Divya Marathi
3 महिन्यांच्या बाळाच्या पोटातून निघाले 450 ग्रॅमचे भ्रूण.

वाराणसी - बीएचयूमध्ये डॉक्टरांनी 3 महिन्यांच्या बाळाचे (मुलगा) ऑपरेशन करून पोटातून 450 ग्रॅमचे भ्रूण काढले आहे. DivyMarathi.Comशी बोलताना पीडियाट्रिक डिपार्टमेंटचे सीनियर सर्जन डॉ. एस. पी. शर्मा म्हणाले, पूर्ण जगातील 200 केसेसपैकी भारतात 30 ते 40 आणि बीएचयूच्या इतिहासात ही तिसरी केस आहे.

 

डेव्हलप होत होते हात-मेंदू
- बिहारच्या भभुआचे राहणारी बाळाची आई रंजुबाला म्हणाल्या- पाटण्यात खूप उपचार केले, डॉक्टर ट्यूमर म्हणाले. पोट सातत्याने फुगतच होते. बाळ दूधही खूप कमी पीत होते.
- डॉक्टरांनी म्हटले की, किडनीचे ऑपरेशन करावे लागेल. यानंतर आम्ही बाळाला दाखवायला बीएचयूमध्ये घेऊन आलो.
- बीएचयूचे पीडियाट्रिक डिपार्टमेंटचे सीनियर सर्जन डॉ. एस. पी. शर्मा म्हणाले, काही दिवसांपूर्वी एक आईवडील आपल्या 3 महिन्यांच्या बाळाला घेऊन आले होते. सुरुवातीला वाटले की, उजव्या बाजूला पोटात मोठा ट्यूमर आहे.
- पाटण्यामध्ये झालेल्या तपासणीत किडनीचा ट्यूमर असल्याची नोंद होती, पण येथे तपासणी केल्यावर तो ट्यूमर नसल्याचे आढळले.
- ऑपरेशन केल्यावर एक अनडेव्हलपड फीटस (अविकसित भ्रूण) निघाले, याचे हात, मेंदू, फुप्फुसे आणि स्पायनल कॉर्ड डेव्हलप होत होते, याची लांबी 13 सेमी होती.

 

जसजसे डेव्हलप होत होते, अडचणी वाढत होत्या...
- डॉ. सरिता चौधरी म्हणाल्या, याला 'फीटस इन फिटु' म्हणतात. यात बाळाच्या पोटात भ्रूण ट्यूमरप्रमाणे विकसित होऊ लागते. फीमेलमध्ये जास्त चांसेस असतात, या केसमध्ये मेल होता.
- नॉर्मल मुलाच्या पोटाच्या वरच्या भागात ओमेंटममध्ये फीटस पोहोचले आणि याप्रकारे हळूहळू तिथे डेव्हलप होऊ लागले.
- बाळाच्या मेन एरोटाच्या माध्यमातून फीटसला आहार मिळतो.
- भ्रूण जसजसे डेव्हलप होते, बाळाला श्वास घ्यायला, आहार घ्यायला अडचणी येऊ लागल्या होत्या.
- ते म्हणाले की, याची कोणतीही सिस्टिम नसते. ऑपरेशन नंतर आता बाळ इतर नॉर्मल बाळांसारखेच राहील.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...