आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमस्खलनात बेपत्ता झालेल्या 5 जवानांचा लागला नाही शोध; खराब हवामानने मोहिमेत अडथळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- उत्तर काश्मीरमध्ये हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेले पाच जवान जिवंत राहण्याची आशा संपुष्टात येत आहे. तिसऱ्या दिवशीही त्यांचा पत्ता लागू शकला नाही. बर्फाच्या वादळामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.


गुरेज आणि नौगाम भागात सोमवारी आलेल्या बर्फाच्या वादळात बेपत्ता झालेल्या जवानांना शोधून काढण्यासाठी अनेक बचाव पथके कार्यरत आहेत. गुरेजमध्येच मंगळवारी लष्कराच्या एका मजुराचा पहाडावरून घसरून मृत्यू झाला होता. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, वरच्या भागात प्रचंड हिमवृष्टी झाल्याने गुरजेमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खराब असल्याने मोहिमेत अडथळे येत आहेत.


काश्मीर, हिमाचलमध्ये तिसऱ्या दिवशीही बर्फवृष्टी : जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या दिवशीही बर्फवृष्टी सुरू होती. कमी दृश्यमानतेमुळे श्रीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ११० उड्डाणे रद्द करण्यात आली. मंगळवारीही दुपारपर्यंत उड्डाण सेवा प्रभावित झाली होती. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग आणि मुघल रस्ता तिसऱ्या दिवशीही बंद होता. लडाख आणि काश्मीरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग संपूर्ण हिवाळाभर बंद करण्यात आला आहे. गुलमर्गमध्ये तापमान उणे ९.८ अंशांपर्यंत घसरले आहे. हिमाचल प्रदेशमध्येही सलग तिसऱ्या दिवशी बर्फवृष्टी तसेच जोरदार पाऊसही झाला. थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...