आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा भीषण अपघात की जागेवरच झाले 5 जण ठार, कारचा असा झाला चेंदामेंदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहराईच - लखनऊ-बहराईच हायवेवर गुरुवारी सायकलस्वाराला वाचवण्याच्या नादात एक भरधाव कार अनियंत्रित झाली. कार थेट रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना चिरडत झाडाला जाऊन धडकली. या अपघातात सायकलस्वार आणि कारचालकासहित 5 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. दुसरीकडे, 3  जण गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दोन जखमींना सीएचसीतून ट्रॉमा सेंटर लखनऊला रेफर करण्यात आले आहे. या घटनेमुळे पीडितेच्या घरी गोंधळ माजला आहे.  

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना लखनऊ-बहराइच हायवेवर रिठोरा-सपसा घाटावरील आहे. जरवलरोड पोलिस स्टेशन परिसरातील जरवल वस्तीतील अहमद शाहनगर गल्लीतील रहिवासी जीशान (28) मंजूर हा शेजाऱ्याची कार घेऊन एका कामानिमित्त  लखनऊला जात होता.
-कारमध्ये याच गल्लीतील इम्तियाज (20) इस्तियाक, वॉर्ड बॉय संदीप श्रीवास्तव (24) आणि मोहम्मद सलीम (22) अन्सारी बसलेले होते.
-गाडी जशी रिठौरा-सपसा वळणावर पोहोचली, समोरून अचानक एक सायकलस्वार आला. त्यापासून वाचण्याच्या चक्करमध्ये त्याचे संतुलन बिघडले. यादरम्यान कार रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना चिरडत झाडाला जाऊन धडकली.
-या अपघातात कारचालक जिशान, सलीम अन्सारी आणि रस्त्याच्या कडेला बसलेला राजेश (35) जगमोहन, मुनीश (24) राजेन्द्र आणि सायकलस्वार साहब दयाल (30) यांचा जागेवरच मृत्यू झाला.
-दुसरीकडे, कारमध्ये स्वार इम्तियाज, वॉर्ड बॉय संदीप श्रीवास्तव, मनोज (20) राज कुमार गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अपघातामुळे मोठा गोंधळ माजला. पोलिसांनी जखमींना सरकारी रुग्णालय मुस्तफाबादेत पोहोचवले.
-डॉक्टरांनी सांगितले की, गंभीर अवस्था झाल्याने मनोज आणि संदीपला ट्रॉमा सेंटर लखनऊला रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे.

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी?
-पोलिस स्टेशन प्रभारी मधुप नाथ मिश्रा म्हणाले, गावकऱ्यांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. तक्रार मिळाल्यावर पुढील कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...