आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरती : राजस्थानात सायबर आणीबाणी; अवघ्या चार तासांच्या परीक्षेसाठी १० तास इंटरनेट बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थानच्या इतिहासात प्रथमच सरकारी सेवेत भरती होण्यासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी राज्यात दैनंदिन तांत्रिक सेवा बंद ठेवण्यात आल्या. याला सायबर आणीबाणी म्हणू शकता. राजस्थानात पोलिस भरतीसाठी चार तासांचा पेपर होता. यासाठी संपूर्ण राज्यातील इंटरनेट सेवा दहा तासांसाठी बंद ठेवण्यात आली. या सायबर आणीबाणीमुळे नेट बँकिंग, रेल्वे आणि सर्व ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले. डिजिटल जगतापासून लोकांचा संपर्क तुटला. अाश्चर्याची बाब म्हणजे,  राज्यातील २०० परीक्षा केंद्रांवर जॅमर लावण्यात आले होते. तरीही इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारीही सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत इंटरनेट सेवा बंद होती. यापुढील काळात कोणत्या ना कोणत्या सेवा भरती परीक्षा होणारच आहेत. त्या वेळीही इंटरनेट सेवा बंद ठेवणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०१८ पासून आॅनलाइन पोलिस भरती परीक्षा सुरू आहेत. 


पोलिसांचे अपयश, जनतेची अडचण  
रेल्वे : ५ हजार ई-तिकीट हाेऊ शकले नाहीत.  

आयआरटीसीची सुमारे दहा हजार ऑनलाइन तिकिटे आरक्षित होत असतात. यापैकी निम्मी तिकिटे मोबाइलवरून होतात. शुक्रवारी इंटरनेट बंद राहिल्याने ५ हजार तिकिटे आरक्षित होऊ शकली नाहीत.  
बँक : २० कोटी रुपयांचे मोबाइल बँकिंग व्यवहार ठप्प  
राज्यभरातून सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचे मोबाइल बँकिंग होतात. जयपूर शहरातच चार कोटींहून अधिक बँकिंग व्यवहार ठप्प झाले होते.  


कॅब : २.५ हजार टॅक्सी, ३० हजार लोकांना फटका  
शहरात ८ हजार ओला-उबेर व इतर टॅक्सी सेवा बंद होत्या. ३० हजार लोकांना शनिवारी याचा त्रास सहन करावा लागला.  


रोडवेज : ५% बुकिंग नाही  
रोडवेजमध्ये दररोज १०% तिकिटे मोबाइलवरून ऑनलाइन बुक होतात. शनिवारी हे प्रमाण निम्म्यावर आले.


परीक्षा इंटरनेटवरून देण्याची पद्धत असली तर सध्याच्या काळात हा निर्णय योग्य आहे. परंतु सगळीकडे इंटरनेट बंद करण्याऐवजी सोशल साइट ब्लॉक करता आल्या असत्या. निवडक साइट्स ब्लॉक करून इतर इंटरनेट सुविधा सुरू ठेवता आल्या असत्या.  
- आेमेंद्र भारद्वाज, माजी पोलिस महानिरीक्षक, राजस्थान  

बातम्या आणखी आहेत...