आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSSच्या कार्यक्रमाचे माजी राष्ट्रपती मुखर्जी प्रमुख अतिथी, 700 स्वयंसेवकांचे घेणार \'बौद्धिक\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघाच्या शिक्षा वर्ग समारोप सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित राहाणार आहेत. (फाइल) - Divya Marathi
संघाच्या शिक्षा वर्ग समारोप सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित राहाणार आहेत. (फाइल)

नागपूर - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संघाच्या 25 दिवसांच्या शिक्षा वर्गाचा समारोप 7 जून रोजी होणार असून या कार्यक्रमाचे निमंत्रण माजी राष्ट्रपतींना देण्यात आले आहे. प्रणव मुखर्जींनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. 

 

राष्ट्रातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रीत करण्याची परंपरा 
- आरएसएसच्या       पदाधिकाऱ्यांनी सांगितले, ज्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी दिले आहे आहे, देशातील अशा प्रमुख व्यक्तींना कार्यक्रमाचे मुख्य अतिथी करण्याची आरएसएसची परंपरा राहिली आहे. त्याच परंपरेत माजी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचा त्यांनी स्वीकार केला आहे. 
- त्यांनी सांगितले, की समारोप सोहळ्याला प्रणव मुखर्जींसह सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या शिक्षा वर्गात 700 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. 

 

प्रणव मुखर्ची नवे सरदार पटेल - आरएसएस 
- आरएसएसचे विचारक गुरुमूर्ती यांनी ट्विट केले आहे, की भाजप संघ परिवाराचा भाग आहे. प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती होण्या अगोदर काँग्रेस नेते आणि भाजपचे राजकीय विरोधक राहिले आहेत. 
- प्रणव मुखर्जी हे अशा संघटनेच्या कार्यक्रमाचे अतिथी होत आहेत, जी संघटना लोकांची सेवा करते. प्रणव मुखर्जी हे आधुनिक सरदार पटेल आहेत. 

 

विरोधक हे शत्रू नसतात - राकेश सिन्हा 
- आरएसएसचे नेते राकेश सिन्हा म्हणाले, प्रणव मुखर्जींनी निमंत्रण स्वीकारले आहे. यातून एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे, की विरोधी पक्षांमध्येही विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. विरोधक हे काही एकमेकांचे शत्रू नसतात. 
- त्यासोबतच सिन्हा म्हणाले, आरएसएस आणि हिंदुत्वावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना यातून उत्तर मिळाले असेल.

 

बातम्या आणखी आहेत...