आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निलंबित आयपीएसच्या घरात सापडली चार कोटींची रोकड, सासुरवाडीतही टाकले छापे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर - उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्यावरून २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विवेककुमार यांच्यावर झालेल्या कारवाईत खास दक्षता पथकाने मुझफ्फरपूर येथे त्यांच्या निवासस्थानी व सासुरवाडीत छापे टाकले. त्यांच्या लॉकरमध्ये सापडलेल्या कागदपत्रावरून ४.३५ कोटी रुपयाची मालमत्ता आढळून आली. 


शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे बँकेच्या लॉकरमधून दक्षता पथकास १२ लाखाचे दागिने व विदेशी चलन सापडले. यात १६८५ कॅनेडियन डॉलर, ४९८ यूएस डॉलर व २६८ मलेशियन डॉलर असे चलन आढळले. मुझफ्फरनगर येथील विवेककुमार यांच्या लॉकरमध्ये १२०० मलेशियन चलन सापडले. शुक्रवारी रात्री दक्षता पथक उशीरा बाहेर पडले.  जिल्हा पोलिसांचा पहारा  आहे. 

 

निवासस्थानी सापडलेले चलन
- ७ लाख ६९,२८० रुपये रोख
- ५९ हजारांच्या जुन्या नोटा
- १२०० रुपये मलेशियन चलन
- ५.४८ लाखांचे दागिने
- ५ लाखांचे घरातील साहित्य
- ५ लाखांची गुंतवणूक संबंधीची कागदपत्रे
- ९ एमएम बोअरची बंदूक

बातम्या आणखी आहेत...