आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गँगस्टरने दिली सलमानला मारण्याची धमकी, जेलमधून FB वर टाकली ही पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉरेंसचे फेसबुक पेज... - Divya Marathi
लॉरेंसचे फेसबुक पेज...

जोधपूर- अभिनेता सलमान खानला जोधपूरमध्ये जिवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टर लॉरेंस पोलिस रिमांडमध्ये असताना देखील फेसबुकवर सक्रीय असल्याचे दिसत आहे. लोरेंन्सच्या फेसबुकवर सलमान खानला धमकी देणारा विडिओ आणि त्यासंबधी प्रकाशित बातम्या पोस्ट केला आहे. यासोबतच लॉरेंन्सचा एक नविन व्हडिओ समोर आला आहे. यात त्याने म्हटले आहे की, हळू हळू सांगू आमच्या मनात काय आहे, आता सांगितले तर लोकांची झोप उडेल....


- FB वर लॉरेंस विश्नोई नावाने तीन वेग-वेगळे अकाउंट बनवले आहेत. यातील एका पेजचे फॉलेव्हर्स पन्नास हजारांहून अधिक आहे, तर दुसऱ्या पेजचे फॉलोअर्स 22 हजारांपेक्षा अधिक आहेत.
- लॉरेंसचे फोसबुक रोज अफडेट होत आहे. ताज्या अपडेटमध्ये सलमान खानला जिवे मारण्याच्या धमकीविषयी लिहिले आहे.
- लॉरेंसने धमकीविषयी विविध वृत्तपत्राती बातम्यांच्याकटींगसह एक जिवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ अपलोड केला आहे.
- या पोस्ट सोबत लॉरेंसने लिहिले आहे की, हळू हळू सांगू आमच्या मनात काय आहे, आता सांगितले तर लोकांची झोप उडेल... लॉरेंसच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.
- एकीकडे गँगस्टर लॉरेंसचे फेसबुक अपडेट होत आहेत, तर दुसरीकड शहरात एका व्यावसायिकाची गोळी झीडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात लॉरेंसला पोलिस रिमांडमध्ये ठेवण्यात आले आहे.
- लॉरेंस स्वत: हे फेसबुक पेज अपडेट करत आहे, की त्याच्या वतिने दुसरा कोणी अपडेट करतोय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


पोलिस कस्टडीत दिली होती धमकी...
- चार दिवसांपूर्वी कडक सुरक्षेत कोर्टात पेशी करताना माध्यामांच्या प्रतिनिधींशी बोलताना लॉरेंसने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली. तो म्हणाला की, मी आजपर्यंत असे काहीच काम केले नाही, ज्यामुळे माझ्या विरोधात खटला चालेल.
- पोलिस नेहमी फेक केसेसमध्ये मलाच अडकवतात. पोलिसांना वाटत असेल की मी काहीतरी करून दाखवावे, तर आता मी सलमान खानला मारून दाखवतो आणि ते ही जोधपूर येथे. तोपर्यंत पोलिसांना कळेल की मी काय आहे.


असा आहे गँगस्टर लॉरेंस....
- स्टूडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब यूनिवर्शिटी(सोपू) नावाची संगठणा लॉरेंस चालवतो. वेगळ्या शैलित समाजसेवा करत असल्याचा दावा लॉरेंस करतो. तो पंजाब आणि हरीयाणा मधील सर्वात खतरनाक गँगमधील एका गँगचे नेतृत्व करतो आणि जेलमधून तो गँगला सुचना देत असतो.
- त्याच्याकडे महागड्या पिस्तोल आणि बंदूकींचा खजीना आहे. दहा वर्षांपूर्वी महाविद्यालयांमध्ये हवेत अंधाधुंद गोळीबार करून त्याने आपली दहशत निर्माण केली आहे. फेसबुक प्रोफाईलवरून असे दिसते की, लॉरेंस भगतसिंह सह अनेक महान क्रातिकारकांना आपला आदर्श मानतो.
- आनंदपालच्या एनकाउंटरनंतर त्याची गँग चालवण्याचा लॉरेंसचा मनसुबा आहे. जेलमध्ये झालेल्या मैत्रीचा फायदा उचलून लॉरेंस आनंदपालच्या गँगसोबत मिळून राजस्थानमध्ये आपले पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
- जोधपूर शहरात खंडणी वसूल करण्यासाठी एका व्यावसायिकाची हत्या करणे आणि अनेक ठिकाणी हवेत फायरिंगक करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, या प्रकरणी त्याच्या सतरा सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...