आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 महिने दररोज 10 तास केली प्रॅक्टिस, आता शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले गोल्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - जून 2017 मध्ये जर्मनीत झालेल्या ज्युनियर शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गौरी शेरॉनने भारताला ब्राँझ मेडल जिंकवून दिले होते. या मेडलचा सर्वांनाच आनंद होता, परंतु गौरी निराश होती. तेथून परतताच तिने दररोज 10 तासांची ट्रेनिंग सुरू केली. यासाठी दोन महिने जर्मनीच्या ऑलिम्पिक चॅम्पियनसोबत प्रॅक्टिस केली आणि मग परतून 5 महिने चंदिगडमध्ये ट्रेनिंग घेतली. याचा परिणाम असा आहे की, तिने मलेशियामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टलमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकवून दिले आहे.

 

चिनी शूटरला मात देऊन बनली टॉप
डीएव्ही कॉलेजची शूटर आणि चंडीगढ़ शहरातील स्टार गौरी शेरॉनने मलेशियात 25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. तिने फायनलमध्ये चिनी शूटरला मात देऊन सर्वोच्च स्थान गाठले.

 

नॅशनलमध्ये 75 पेक्षा जास्त पदके
गौरीकडे खूप अनुभव आहे आणि तिने आपल्या इंटरनेशनल करिअरची सुरुवात 2013 मध्ये शूल जूनियर वर्ल्ड कपमधून केली होती. तिने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत 30 आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप खेळल्या आहेत, यात तिने 23 मेडल भारतासाठी प्राप्त केले आहेत. दुसरीकडे नॅशनलमध्ये तिने 75 हून जास्त मेडल जिंकले आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...