आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षकाने विद्यार्थिनीस उडी टाकण्यास सांगितले, डोक्‍याला मार लागल्‍याने दगावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोइम्बतूर/चेन्नई - तामिळनाडू येथील कोइम्बतूर येथील कलई मगल आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापनावर सराव सुरू असताना प्रशिक्षकाने एका विद्यार्थिनीस दुसऱ्या मजल्यावरून धक्का देऊन खाली पाडले. तिच्या डोक्याला मार लागल्याने विद्यार्थिनी जागीच ठार झाली. प्रशिक्षक आर. अरुमुगम यास पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए)च्या नावावर प्रशिक्षण घेण्यात येत होते. तर यासाठी कोणतीही मंजुरी घेण्यात आली नव्हती. एनडीएमएने म्हटले, या सरावाचा आपल्याशी काही संबंध नाही. प्रशिक्षकास अशा सरावासाठी अधिकृत नियुक्ती देण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी सांगितले, बीबीए द्वितीय वर्षात शिकत असलेली एन. लाेकेश्वरी या विद्यार्थिनीची उडी टाकण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु प्रशिक्षक अरुमुगम तिला धक्का देऊन खाली पाडतो, असे घटनेच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. सुरक्षेसाठी खाली जाळी लावण्यात आली होती. परंतु विद्यार्थिनीचे डोके पहिल्या मजल्याच्या गॅलरीला धडकले. त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला.

बातम्या आणखी आहेत...