आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीने लग्नासाठी ठेवली अशी अट, मुलाने केली पूर्ण, टॉयलेटमध्ये घातली वरमाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छत्तीसगड)- येथील एका तरूणाचे लग्न नुकतेच बिलासपूर येथील एका तरूणीशी ठरले आहे, परंतु निकाहच्या अगदी काही दिवस आधी तरूणीने एक अट ठेवली आहे. तरूणीला तरूणाच्या घरात पक्के टॉयलेट नसल्याची माहिती मिळाली, तेव्हा तिने लग्न करण्यास नकार दिला. आधी तरूणाने पक्के टॉयलेट बांधावे अशी अट तरूणीने ठेवली आहे.


घरात टॉयलेट बांधल्यानंतर लग्नास तयार...
येथील गुढीयरी परिसरात रहाणाऱ्या सरफराजला मार्च 2017 मद्ये शबाच्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल कळाले तेव्हा त्याला धक्का बसला. यानंतर तो नगरपालिकेच्या कार्यालयात पोहोचला आणि टॉयलेट बनवण्याची मागणी केली. मे मध्ये दिलेल्या अर्जानंतर पालिकेने जूनमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत टायलेट बांधले. तेव्हा कुठे शबा लग्नास तयार झाली. 21 जानेवारी 2018 ला दोघांनी सर्वांच्या सहमतीने आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत निकाह केला. परंतु, एक पॉझिटीव संदेश देण्यासाठी बुधवारी त्यांनी पब्लीक टॉयलेटमध्ये एकमेकांना वरमाळा घातल्या.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...