आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोफाइल Drama: पती हात बांधून उभा, पत्नीने गर्लफ्रेंडची केली धो-धो धुलाई; पाहा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - पंजाबच्या एका महिलेने उत्तराखंडमध्ये आपल्या पतीच्या प्रेयसीची रस्त्यावरच धुलाई केली. हायप्रोफाइल नाट्याचा सोमवारचा हा व्हिडिओ समोर आला आहे. तिने आपल्या पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला पकडले होते. स्थानिकांनी हा व्हिडिओ बनवला आहे. पोलिसांना यासंदर्भात मिळालेल्या तक्रारीनंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात शांतता भंग करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत.


असे आहे प्रकरण...
- जालंधरच्या करोलबाग येथील रहिवासी असलेल्या महिलेचा पंजाबच्याच रोपड येथील रहिवासीसोबत 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. हे दांपत्य गेल्या काही वर्षांपासून उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यात राहतात. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिचा पती दिल्लीत नोकरीला होता. तसेच दिल्लीहून रुडकीला अप-डाऊन करायचा. 
- काही महिन्यांपूर्वीच दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान तिच्या पतीचे शेजारीच राहणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध सुरू झाले. 
- एवढेच नव्हे, तर ते गेल्या काही महिन्यांपासून एकाच घरात राहत होते. त्याची गर्लफ्रेंड आपल्या पतीला सोडून रुडकीला या पुरुषासोबत राहायला आली होती. सुरुवातीला यासंदर्भात पत्नीला काहीही माहिती नव्हते.
- पत्नीला अचानक आपल्या पतीसोबत दुसरीच एक महिला घरात राहत असल्याचे कळाले. त्यानंतर ती आपल्या कुटुंबियांना घेऊन रुडकीतील घरात आली आणि राडा केला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या तिघांच्या विरोधात शांतता भंग करण्याचे आरोप लावून त्यांन ताब्यात घेतले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...