आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍तर प्रदेशमध्‍ये दोन मैत्रिणी लग्नासाठी अडून बसल्या, पालकांचा विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घरातून पळून गेलेल्या दोन मैत्रिणी घरी परतल्या. त्यांनी आपसात लग्न करण्याचा निर्णय पालकांना सांगितला. त्यांच्या निर्णयावरून दोघींच्या घरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पालकांनी या लग्नास कडाडून विरोध दर्शवला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिसाडी येथील समर गार्डनमध्ये राहणाऱ्या दोन तरुणी शेजारी आहेत. त्यांच्यात लहानपणापासून खूप घट्ट मैत्री होती. या दोघी तीन दिवसांपूर्वी घरातून गायब झाल्या. त्या हरवल्याची माहिती पोलिस ठाण्यास कळवण्यात आली नव्हती. परंतु दोघींच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले होते. शुक्रवारी सायंकाळी दोघी घरी परतल्या. घरी येताच त्यांनी आम्ही दोघी लग्न करणार आहोत, असा निर्णय जाहीर केला.  या तरुणींच्या पालकांनी त्यांना कडाडून विरोध केला. तेव्हा त्यांनी घरातच आकांडतांडव माजवण्यास सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...