आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रेटर नोएडात दोन बहुमजली इमारती कोसळल्या; तिघांचा मृत्यू, 30 लोक दबल्याची भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा- शाहबेरी भागात मंगळवारी रात्री १० वाजता दोन बहुमजली इमारती कोसळल्या. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक लोक दबले गेल्याची भीती आहे. एनडीआरएफचे ९० कर्मचारी व स्थानिक लोकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले. जमीनदोस्त झालेली एक इमारत ५ मजली होती. तर दुसऱ्या सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. यात एक कुटुंब व २० हून अधिक मजूर राहत होते. एका इमारतीचा ढिगारा इतका मोठा हाेता की त्यात दबलेल्या लोकांना काढणे उशिरापर्यंत शक्य झाले नाही. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.


एनडीआरएफ, आयटीबीपी आणि जिल्हा प्रशासनाचे पथक बचाव कार्य करत आहेत. मलब्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात येत आहे. या परिसरात अतिशय अरुंद रस्ते असल्यामुळे जेसीबी आणि इतर मोठे वाहणे घेऊन जाण्यास अडथळा येत आहे. यामुळे रेस्क्यू ऑपरेशन धीम्या गतीने सुरू आहे. एनडीआरएफचे 90 कर्मचारी आणि स्थानिक लोक हाताने मलबा काढून लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.


एक कुटुंब 12 तासांपूर्वीच या इमारतीत शिफ्ट झाले होते... 
प्रत्यक्षदर्शी पंकजने सांगितले की, यातील एका बिल्डिंगमध्ये मंगलवार दुपारीच एक कुटुंब शिफ्ट झाले होते. त्या कुटुंबात 4-5 लोक होते. ते फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर अवघ्या 12 तासातच सर्वजण मलब्याखाली दबले गेले. पंकजने सांगितले की, दोन्ही इमारती कोसळ्यानंतर आसपासचे लोक पोहोचले त्यामुळे कोणालाच वाचवता आले नाही

बातम्या आणखी आहेत...