आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 महिन्यांपूर्वी झाले खासदाराच्या भाच्याचे लग्न; कारसमोर आली नीलगाय, झाले होत्याचे नव्हते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशीष सहरावत पत्नी सोबत (फाइल) - Divya Marathi
आशीष सहरावत पत्नी सोबत (फाइल)

कुरुक्षेत्र (हरियाणा) - येथील शाहाबाद येथे भाजप खासदार धर्मवीर यांचे भाचे आशीष सहरावत यांचा अपघातात मृत्यू झाला. आशीष हे पीडल्ब्यूडीमध्ये एसडीओ पदावर कार्यरत होते. ते त्यांच्या कारने लाडवा येथून पंचकूलाच्या दिशेने निघाले होते. अचानक त्यांच्या कारसमोर नीलगाय आली. नीलगायीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावर जाऊन धडकली. आशीष यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील होती. त्यांच्या पत्नीची प्रकृती अजून गंभीर आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.


असा झाला अपघात... 
- शुक्रवारी रात्रीची ही घटना आहे. आशीर सहरावत त्यांच्या पत्नीसह लाडवा येथून पंचकुलाला निघाले होते. 
- शाहाबाद जवळ अचानक त्यांच्या गाडीसमोर नीलगाय आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या किनाऱ्याला असलेल्या खांबावर जाऊन आदळली. 
- आशीष सहरावत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 
- आशिष यांचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. 
- घटनेची माहिती मिळताच खासदार धर्मबीर कुरक्षेत्र येथे पोहोचले. 
- पोलिसांनी पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. 

 

पुढील स्लाइटवर क्लिक करुन पाहा, घटनास्थळाचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...