आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन, पाच भाविकांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे यात्रा थांबवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. दरम्यान, बालटाल मार्गावर मंगळवारी भूस्खलन झाल्याची घटना घडली या घटनते पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की,  बालटाल मार्गावर रेलपतरी आणि बाररारीमर्गदरम्यान भूस्खलन झाल्याने ही दुर्घटना घडली. यासोबतच अमरनाथ यात्रेतदरम्यान यावर्षी मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. सोमवार ते मंगळवार सकाळी पर्यंत वेग-वेगळ्या कारणांमुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. याआधी बीएसएफच्या एक अधिकारी, एक स्वयंसेवक आणि एक पालकी वाहकाचा देखील मृत्यू झाला होता.

 

पोलिसांनुसार, संध्याकाळी रेलपतरी आणि बरारीमर्ग परिसरात भूस्खलन झाले. दरम्यान, यात्रेत सहभागी झालेले सात यात्रेकरू मलब्याखाली दबले. घटनास्थळी उपस्थीत असलेल्या मदत पथकाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले.  मलब्यातून काढण्यापूर्वीच तीन लोकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनुसार, मृत्यू झालेल्या लोकांची ओळख अजून पटलेली नाही. त्यांना पालटाल येथील रूग्णालयात आणण्यात आले. अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू झाली आहे. ही यात्रा 60 दिवस चालणार आहे. यात्रेच्या पाचव्या दिवशी सोमवारी सर्वाधिक 22,500 यात्रेकरूंनी दर्शन घेतले. आतापर्यंत 36,366 भाविकांनी दर्शन घेतले आहे. 

 

राजनाथ सिंह दोन दिवसाच्या दौऱ्यावर 
राज्यात 20 जूनला राज्यपाल शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर गृहराज्यमंत्री  राजनाथ सिंह पहिल्यांदा बुधवारी दोन दिवसाच्या दौऱ्यावर श्रीनगर येथे पोहोचले. ते अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. भाजपने महबूबा मुफ्तीच्या नेतृत्वातील पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी)सोबत  असलेली युती 19 जूनला तोडली होती.

बातम्या आणखी आहेत...