आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात मुसळधार पाऊस, पूर; हावडा नदी धोक्याच्या पातळीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरतळा - पश्चिम त्रिपुरातील आथरामुरा आणि बारामुरा हिल्स भागात रविवारी सकाळी मुसळधार पावसामुळे पूर आला. पुरामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आगरतळा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. हावडा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

आगामी २४ तासांत आणखी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे एनडीआरएफ, टीएसआर, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. हावडा नदीजवळील भागात अनेक ठिकाणी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

भूस्खलनाचे २ बळी, ३ जण जखमी

गोमती जिल्ह्यात भूस्खलनामुळे रविवारी २ जणांचा मृत्यू झाला. मृतांत दहावीच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. दोन कुटुंबांतील तीन जण जखमी झाले आहेत. राज्य शासनाने मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

पुढील स्लाईडवर पहा, आणखी छायाचित्र ...

बातम्या आणखी आहेत...