आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौसेनेच्या तळांवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचतेय जैश, पाकच्या बहावलपूरमध्ये दिले जातेय Training

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - काश्मीरमध्ये लष्कर राबवत असलेल्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे चिडलेली पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आता भारतीय नौदलावर हल्ल्याचा कट रचत आहे. पश्चिम राजस्थानला लागून असलेल्या सीमेपलिकडे पाकिस्तानच्या पंजाब येथील बहावलपूर आणि रहमियार खाँ अशा जैश-ए-मोहम्मदच्या कॅम्पमध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. 


जैशचा म्होरक्या मसूद अझहरने यासाठी 20 ते 25 दहशतवाद्यांची निवड केली आहे. त्यांना समुद्रातील नौदलाच्या तळांवर हल्ला करण्याचे ट्रेनिंग दिले जात आहे. देशातील एका प्रमुख गुप्तचर संस्थेकडून माहिती मिलाल्यानतर नौदलाने अलर्ट जाहीर केला आहे. विशेषतः पश्चिम क्षेत्रातील नौदलाच्या कमांडने गस्त आणि पहारा वाढवला आहे. नौसेनेचे प्रवक्ते कॅप्टन डीके शर्मा यांचे म्हणणे आहे की, अलर्ट आल्यानंतर किंना नाही आला तरी नौदल कायम कोणत्याही धोक्यासाठी सज्ज असते. 


डीप डायविंगचे ट्रेनिंग 
मसूद अझहरला कंधार विमान अपहरणानंतर सोडण्यात आले होते. त्याची संघटना दहशतवाद्यांना 26/11 सारख्या मोठ्या हल्ल्यांसाठी डीप डायविंग, म्हणजे खोलवर सूर मारून पाण्यातच हल्ला करण्याचे सैनिकांसारखे प्रशिक्षण देत आहेत. त्यांचा कट मुंबई हल्ल्याप्रमाणे किनारी भागांत किंवा खोल समुद्रात तयार करण्यात आलेल्या युद्ध तळांवर हल्ला करण्याचा आहे. 

 

सूरतगड हल्ल्याचा अपयशी प्रयत्न येथूनच 
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जैशचे दहशतवादी अनेक वर्षांपासून दहशतवादी कॅम्प चालवत आहेत. गेल्या चार वर्षांत मसूद अझहरने ते अधिक सक्रिय केले आहेत. याच कॅम्पमध्ये पठाणकोट हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी राजस्थानच्या सूरतगड एअरबेसवर हल्ल्यासाठीही जैशने 10 दहशतवादी तयार केले होते. त्यांना बहावलपूर आणि मिनचिनाबादच्या दहशतवादी शिबिरांत ट्रेनिंग देण्यात आले होते. हे दहशतवादी 30 आणि 31 ऑगस्ट 2015 च्या रात्री हारूनाबादला पोहोचले होते. हे सूरतगडच्या जवळ आहे. त्याठिकाणाहून त्यांनी इंटरनॅशनल बॉर्डरच्या पिलर क्रमांक 340 च्या आसपास घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान बीएसएफच्या सतर्कतेमुळे हा घुसखोरीचा प्रयत्न फसला होता. 

बातम्या आणखी आहेत...