आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीला आणि सुट्यात रेल्वे प्रवास होणार महाग, विमानाप्रमाणे रेल्वेतही राहतील बदलते दर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - नव्या वर्षापासून सणासुदीत आणि सुट्यांच्या मोसमात जास्तीचे रेल्वे भाडे द्यावे लागू शकते. पश्चिम मध्य रेल्वेसह तीन विभागाकडून भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याला ‘डायनामिक प्राइसिंग’ असे नाव देण्यात आले आहे. 

 

यामुळे रिकाम्या धावणाऱ्या रेल्वेच्या भाड्यात घसघशीत सूट मिळणार आहे. यामध्ये पश्चिममध्ये रेल्वेच्या भोपाळ-ग्वाल्हेर आणि हबीबगंज-जबलपूर इंटरसिटीसह अर्ध्या डझनाहून अधिक रेल्वेचा समावेश आहे. आसनांनुसार तिकीट दरांत ५० टक्क्यापर्यंत सूट मिळू शकेल. म्हणजे ज्या रेल्वेत प्रवाशांचा जास्त भार असेल तर भाडे १० ते २० टक्क्यांनी वाढलेले असेल. रिकामी असेल तर ५० टक्के भाडे कमी होईल. पश्चिम-मध्य रेल्वेचे प्रवक्ता गुंजन गुप्ता यांनी सांगितले, हा प्रस्ताव अमलात आणण्याची तयारी सुरू आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीत झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी फ्लेक्झी फेअर सिस्टिमवर चर्चा केली. यात २५० हून अधिक रेल्वेत ५० टक्क्याहून कमी प्रवाशी असतात.
प्रत्येक मंडळात निवडक रेल्वेत तिकिटांची व्यवस्था बदलण्याचे आदेश : पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायनामिक प्राइसिंग सुरू करण्यासाठी  रेल्वेला संगणकाचे सॉफ्टवेअर पुरवठा करणाऱ्या क्रिसला प्रत्येक मंडळात निवडक रेल्वेसाठी तिकिटाच्या व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.


जानेवारी अखेरपर्यंत निवडक रेल्वेमध्ये नव्या दराची चाचणी घेतली जाईल. चाचणी यशस्वी ठरली तर फेब्रुवारीत देशभरातील सर्व मंडळात ही व्यवस्था लागू होईल. काही दिवसापूर्वीच रेल्वेमंत्री गोयल यांनी रेल्वेत विमानाप्रमाणेच तिकीट दर राहण्याचे सूचित केले होते.

 

तीन श्रेणीत विभागल्या गेल्या रेल्वे
रेल्वेस प्रवाशांची सुविधा, वक्तशीरपणा आणि केटरिंगच्या सुविधानुसार तीन श्रेणीत विभागल्या जातील. यानुसार सुपर प्रीमियम, प्रीमियम आणि नॉन प्रीमियम रेल्वे असतील.

 

किरायाचे असे असतील टप्पे 

सुट्या, सण आणि विवाह आणि परीक्षा काळ सुगीचा काळ मानला जाईल. यात सुपर रेल्वेचे भाडे जास्त, प्रीमियममध्ये थोडी वाढ होईल. एरवीच्या काळात व अजिबात गर्दी नसलेल्या काळात दरात सूट दिली जाईल.

 

गर्दीच्या काळातील प्रीमियमचे भाडे
पहिल्या १० % आसनावर रेल्वेद्वारा सामान्य भाडे घेतले जाईल. नंतरच्या
प्रत्येक १०% आसनावर नोंदणीदरम्यान भाड्यात १० टक्के वाढ होत जाईल. ती ५० % पर्यंत असेल.

 

दर बारा तासाला १०% कमी होतील दर
प्रवासाच्या तारखेच्या दोन दिवस आधी रेल्वेची ५०% तिकीट विक्री झाली असेल तर दर १२ तासाला १०-१० % च्या स्लॅबनुसार कमी होत जाईल. तिकीटाचा चार्ट तयार होईपर्यंत अशी सूट मिळेल. यानंतरही आसने रिक्त असल्यास त्यावरही १० टक्के सूट मिळेल.

 

बातम्या आणखी आहेत...