आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाला- राम रहिमची तथाकथित दत्तक मुलगी हनीप्रीत सध्या तरुंगात चांगलीच त्रस्त झाली आहे. अंबाला मध्यवर्ती कारागृहामध्ये पोहोचलेल्या महिला आयोगाच्या सदस्यांसमोर हनीप्रीतने आपले हे दु:ख व्यक्त केले आहे.
हनीप्रीतला होतोय याचा त्रास
- हनीप्रीतने सांगितले की, मी जेल प्रशासनाला आपल्या कुटुंबाचे दोन मोबाईल नंबर दिले आहेत. याला बराच काळ झाला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने हे नंबर व्हेरिफाय केलेले नाही.
- आपल्याला कुटुंबाशी बोलायचे असून तुरुंग प्रशासनामुळे कुटुंबाबतची कोणतीही माहिती आपल्याला मिळत नाहीए, असे हनीप्रीतने महिला आयोगाला म्हटले आहे.
तुरुंगात महिलांना प्राथमिक सुविधाही मिळत नाही- महिला आयोग
- महिला आयोगाच्या सदस्यांनी दोन तास तुरुंगात महिलांना पुरवण्यात येणा-या सुविधांची तपासणी केली.
- नंतर आयोगाच्या सदस्या प्रिती भारद्वाज म्हणाल्या की, 'महिलांच्या काही समस्या होत्या. ज्या त्यांनी आमच्यासमोर ठेवल्या. तुरुंगात महिलांना प्राथमिक सुविधाही दिल्या जात नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. येथे काही महिला कैद्यांसोबत 6-6 मुले आहेत. मात्र त्यांना खेळण्यासाठी खेळण्याही देण्यात आलेले नाहीत.'
पुढील स्लाइडवर पाहा, फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.