आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात तीन राज्यांत वादळी वाऱ्याचा तडाखा, 45 मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा / रांची / लखनऊ - देशातील तीन राज्यांत सोमवारी रात्री आलेल्या वादळामुळे वीज कोसळण्यासह विविध घटना घडल्या. त्यात किमान ४५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १९ मृत्यू बिहारमध्ये, उत्तर प्रदेशात १५ तर झारखंडमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. या दरम्यान ताशी ७० किलो मीटर एवढा वाऱ्याचा वेग होता. आगामी काही दिवसांत उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी वारे ताशी ५० ते ७० किमी वेगाने वाहू लागतील.


मे महिन्यात देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत चारवेळा वादळाने थैमान घातले. २ व ३ मे रोजी रात्री आलेल्या वादळामुळे पाच राज्यांत १३४ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांपैकी  ८० उत्तर प्रदेशातील होते. त्याशिवाय ९ व १० मे रोजी रात्री आलेल्या वादळामुळे सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला होता. १४ मे रोजी वादळाशी संबंधित घटनांत ५१ जणांचा मृत्यू झाला होता.


तीन दिवस अगोदर पोहोचला मान्सून : नैऋत्यू मोसमी पाऊस वेळेच्या तीन दिवस अगोदर केरळमध्ये पोहोचला असल्याच्या वृत्तास हवामान खात्याने दुजाेरा दिला आहे. किनारपट्टीवर रिमझिम पाऊस सुरू आहे. येत्या ४८ तासांत तमिळनाडू, बंगालची खाडी व अंदमान सागरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यंदा सरासरी पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. केरळमध्ये मान्सून १ जून रोजी हजेरी लावतो. मात्र मान्सून केरळमध्ये दाखल झाला असा दावा ‘स्कायमेट’ ने केला होता. त्याची पुष्टी हवामान विभागाने मंगळवारी केली. दरम्यान, कर्नाटकात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, अनेक मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी गेले. परत येताना ते वादळात अडकले होतेे. तटरक्षक दलाने तत्काळ धाव घेत चार जणांना वाचवले, तर दाेघांचा शाेध अद्यापही सुरू अाहे. 

 

मध्य व उत्तर भारताची तूर्त उष्णतेपासून सुटका नाही, बुंदीमध्ये पारा ४९ अंशांवर
दक्षिण भारतात मान्सूनने भलेही हजेरी लावली असली तरी उत्तर व मध्य भारताला अजून काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. संपूर्ण भागात उष्णतेची लाट आहे. राजस्थानच्या बंुदीमध्ये मंगळवारी पहिल्यांदाच तापमान ४९ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. बारांमध्ये पारा ४७ अंशांवर होता. स्थानिक प्रशासनाने अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्याचा शिडकावा करून रस्त्यांवर काहीसा थंडावा आणण्याचा प्रयत्न केला. राजस्थान व मध्य प्रदेशच्या अनेक भागात बुधवार देखील उष्णतेची लाट राहील. उत्तराखंंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली व बिहारमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बातम्या आणखी आहेत...