आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाशात नेट वापर केला तर दर तासाला द्यावे लागतील 1000 रुपये जास्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - विमानात वायफाय सुविधा प्रवाशांना आता खूप महाग पडणार आहे. यासाठी प्रवाशांना खूप मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. सध्या ज्या देशात ही सुविधा उपलब्ध आहे, तेथील दरानुसार ही स्थिती असेल. या देशात फक्त दहा एमबी इंटरनेट डाटाचा वापर करण्यासाठी सुमारे ४.५ डॉलर म्हणजे ३०२ रुपये द्यावे लागतात.  


या अाधारे देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाच मिनिटांपासून १ तासापर्यंत विमानात इंटरनेटचा वापर करायचा झाल्यास ५०० ते १००० रुपये मोजावे लागतील. म्हणजे दर महिन्यास जितके माेबाइलचे बिल येते तितकाच खर्च विमानात काही मिनिटे इंटरनेट वापरण्यासाठी वायफाय वापरल्यास येणार आहे.  या किमतीवर अंतिम निर्णय इन-फ्लाइट वायफाय सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या निवडीनंतरच ठरेल. वायफायचे बिल भरल्यास प्रवाशांना मर्यादित एमबीमध्ये वेब ब्राऊजिंग व ई-मेलचा वापर करण्याची जबाबदारी मिळेल. 

 
मोबाइल आणि लॅपटॉपसाठी वेगळ्या असतील किमती 

अमेरिकेत विमानात वायफाय सुविधा वापरण्यासाठीच्या किमती उपकरणानुसार असतील. जर प्रवासी मोबाइलवर इंटरनेट सुविधा हवी असेल तर त्याला ४.९५ ते १९.९५ डॉलर (सुमारे ३३१ ते १३३६ रुपये दरम्यान ) आणि लॅपटॉपसाठी ११ ते ४९ डॉलर (सुमारे ७३७ ते ३२८३ रुपये दरम्यान) पैसे द्यावे लागणार आहेत. जगात तीन ते चार प्रमुख कंपन्या विमानात वायफाय सुविधा देतात. इंडियन एअरलाइन्स या कंपन्यांच्या संपर्कात असते. विमानातून ई-मेल पाठवणे, घेणे, त्वरित संदेश पाठवणे, वेब ब्राऊजिंग, गाणी, व्हिडिओ किंवा चित्रपट पाहण्यासाठी वेगवेगळ्या किमती द्याव्या लागतील. ब्रिटिश एअरवेज त्यांच्या प्रवाशांसाठी दोन पॅकेज उपलब्ध करून देते. यातील एक पॅकेज ब्राऊजर पॅकेज असते. यात वेब ब्राऊजिंग, ई-मेल सुविधा पाठवणे व स्वीकारणे आणि संदेशाची सुविधा देते.  

 

क्रू सिक्युरिटी देणार माहिती  

*विमान उड्डाण करण्यापूर्वी विमानात क्रू सिक्युरिटी प्राेसिजरबरोबर वायफाय सुविधेची उपलब्धता व वापराच्या पद्धतीची माहिती देईल.  
* ३ हजार मीटरवर गेल्यानंतर विमानात वायफाय पोर्ट सुरू केले जाईल.  
* प्रवाशांना मोबाइल अथवा लॅपटॉप उपकरणास वायफाय पोर्ट कनेक्ट करताच सर्व्हिस प्रोव्हायडरचे होेम पेज उघडले जाईल.  
* होमपेजवर वायफायच्या वापरासाठी विविध पॅकेज दिले जातील. पॅकेजचे पैसे भरल्यानंतर मोबाइल व लॅपटॉपमध्ये इंटरनेट सुविधा सुरू केली जाईल. यासाठी वेगळे पॅकेज देण्यात येईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...