आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूर महिला आयोग कार्यालयात,लावले लग्न, आयोगाने स्वीकारले पालकत्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर -   जयपूर येथील लाल कोठी येथे असलेल्या महिला आयोगाच्या कार्यालयात गुरुवारी शहनाईचे मंजूळ स्वर निनादत होते. या मंजूळ स्वरात प्रेमीयुगुलाचा विवाह संपन्न झाला. अल्प वेळेत पार पडलेल्या या विवाहासाठी आयोगाच्या अध्यक्षासह सदस्य,  अधिकारी व कर्मचारी घाईघाईने कामाला लागले होते. तरुणीचे पालक झालेल्या आयोगाने विवाहाचे सर्व विधी यथासांग पार पाडले. ज्योती-मनीष यांच्या वैदिक पद्धतीने पार पडलेल्या या विवाहाचे पौरोहित्य पंडित चक्रवर्ती सामवेदी यांनी केले.  अायोगाच्या स्थापनेनंतर प्रथमच एका तरुणीचे लग्न तिच्या इच्छेनुसार लावून देण्यात आले.  

 

विवाहाचे साक्षीदार  

महिला आयोगाच्या सदस्य डॉ. रिता भार्गव व सुषमा कुमावत, बाल आयोगाच्या सदस्य जयश्री गर्ग व एस. पी. सिंह, सदस्य सचिव अमृता चौधरी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक योगिता मीना, रजिस्ट्रार अजय शुक्ला, कौटुुंबिक न्यायालयाचे दोन्ही न्यायाधीश कुंवर महेंद्रसिंह राघव व अजय भोजक या विवाहाचे साक्षीदार ठरले. 

 

जोडप्यास यांनी दिला आशीर्वाद 

जोडप्यास शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत आशीर्वाद दिला. शहर उपाध्यक्ष ब्रह्मकुमार सैनी यांनी म्हटले, बदलत्या काळानुसार जात व धर्म तरुणांसाठी बाधा ठरू नयेत. प्रेमाला सीमा  अथवा बंधन नसते, हे या लग्नामुळे सिद्ध झाले. 

 

वरपित्याने आणले लग्नाचे कपडे 

हुंडा न घेता झालेल्या या लग्नात वर-वधूसाठी कपडे वरपित्याने आणले होते. हे कपडे परिधान करून वधूची पाठवणी करण्यात आली. आयोगाने या विवाहाची नोंदणी न्यायालयात व मंडळात केली होती. 

 

घरच्यांवर विश्वास नव्हता म्हणून आम्हीच लग्न लावले
तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून द्यावे, असे आम्हाला वाटत होते. परंतु ज्योतीला घरच्यांवर विश्वास ठेवावा असे वाटले नाही. ती घरी जाण्यासही तयार नव्हती. तेव्हा आम्ही तिचे लग्न आयोगाच्या कार्यालयात लावून देण्याचे ठरवले. थोड्या अवधीत लग्नाची सर्व तयारी करण्यात आली. आयोगाने ज्योतीचे पालकत्व स्वीकारले. हिंदू पद्धतीने विवाह पार पाडला.
सुमन शर्मा, अध्यक्षा, महिला आयोग

 

 

बातम्या आणखी आहेत...