आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. के. शिवकुमार काँग्रेसचे नेते; ज्यांनी विलासराव, पटेलांनंतर राजकीय शत्रू कुमारस्वामींना वाचवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शर्मा ट्रॅव्हल : ने-आण करण्यास काँग्रेसने दाखवला विश्वास - Divya Marathi
शर्मा ट्रॅव्हल : ने-आण करण्यास काँग्रेसने दाखवला विश्वास

बंगळुरू - कर्नाटकमध्ये काँग्रेस व जेडीएस आमदारांची फूट टाळण्यात काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २००२ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काँग्रेसचे िवलासराव देशमुख यांचे सरकार कोसळण्याच्या स्थितीत होते. अशा स्थितीत विलासरावांनी आमदारांना सांभाळण्यासाठी कर्नाटकला आणले. तेव्हा कर्नाटकात काँग्रेसचे सरकार होते. एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री होते. तेव्हा कृष्णा यांनी आमदारांना  सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शिवकुमार यांच्यावर सोपवली होती.

 

ते आमदारांना इगलटन रिसॉर्टमध्ये घेऊन गेले आणि आठवडाभर तिथे ठेवले. बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी आमदारांना मुंबईत आणले आणि देशमुख सरकार वाचले. या घटनेमुळे त्यांना गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय केले. ते गौडा कुटुंबाच्या गड असलेल्या भागातून जिंकले आहेत. गौडांविरुद्ध त्यांचा खूप जुना संघर्ष आहे. शिवकुमार वोक्कालिगा समाजाचे आहेत. प्रथमच कनकपुरा तालुक्यातील सथनूरहून १९८९ मध्ये त्यंानी निवडणूक लढवली होती व माजी पीएम एच. डी. देवेगौडा यांच्याकडून हार पत्करली होती.  


१९९० मध्ये मध्ये एस. बंगारप्पा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी शिवकुमार यांना तुरुंग व होमगार्ड खात्याचे राज्यमंत्री केले. तेव्हा ते केवळ २९ वर्षांचे होते. १९९९ मध्ये शिवकुमार नगरविकास मंत्री झाले. २००२ मध्ये देवेगौडांविरुद्ध कनकपुरा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढली. मात्र, त्यांचा पराभव झाला. २००४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत देवेगौडांना पराभूत करून बदल घेतला. मात्र, राज्यात काँग्रेस हरली होती. काँग्रेस-जेडीएसचे सरकार झाले व शिवकुमार बाहेर राहिले. २०१३ मध्ये सिद्धरामय्यांशी मतभेद झाल्यामुळे मंत्रिपद घेतले नाही.

 

जानेवारी २०१४ मध्ये ऊर्जामंत्री झाले. समान शत्रू गौडांमुळे दोघे सोबत काम करू लागले. भाजपने गेल्या ऑगस्टमध्ये सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना हरवण्याची रणनीती आखली तेव्हा शिवकुमार यांनी गुजरात भाजप आमदारांना इगलटन रिसॉर्टमध्ये आश्रय दिला होता. निवडणुकीत बहुमत न मिळाल्याने शिवकुमार यांनी गौडा कुटुंबाशी हातमिळवणी केली. त्यांनी तीन दिवस आमदारांना इगलटन रिसॉर्टमध्ये थांबून घेतले. यानंतर बसने आमदारांना हैदराबादला नेले व  मतदानाच्या एक दिवस आधी परत कर्नाटकला आणले. शिवकुमार यांनी बेपत्ता झालेल्या प्रताप पाटील व आनंद सिंह यांनाही आणले.

 

डी. के. शिवकुमार काँग्रेसचे सर्वात श्रीमंत उमेदवार  
एकूण संपत्ती ८४० कोटी, ५ वर्षांत ५८९ कोटींची संपत्ती कमावली  
डी. के. शिवकुमार विधानसभेत प्रवेश करणारे दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ८४० कोटी रु. आहे. २०१३ मध्ये निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी २५१ कोटी संपत्ती जाहीर केली हाेती. या हिशेबाने पाच वर्षांत त्यांची संपत्ती ५८९ कोटी वाढली. म्हणजे २३४% वाढली.  

 

शर्मा ट्रॅव्हल : ने-आण करण्यास काँग्रेसने दाखवला विश्वास  

काँगेसने आमदारांची ने-आण करण्यासराठी शर्मा ट्रॅव्हल्सच्या बसवर विश्वास दाखवला. काँग्रेसचे विश्वासू वाहतूकदार डी. पी. शर्मा यांच्या या बस आहेत. राजस्थानच्या धनराज शर्मा १९८० पासून दक्षिणेतील राजकारणात सक्रिय आहेत. शर्मांनी १९९८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला. धनराज शर्मांचे २००१ मध्ये निधन झाले. आता मुलगा सुनीलकुमार शर्मा कंपनी चालवतो. राज्यात प्रथम विलासराव देशमुख व त्यांच्या आमदारांना याच बसने आणले होते.  

 

सिद्धरामय्या  कर्नाटकचे माजी सीएम सिद्धरामय्यांनी १५ मे रोजी अंतिम निकाल येईपर्यंत मोर्चा सांभाळला. सायंकाळपर्यंत बाजू भाजपकडे झुकत नसल्याचे दिसताच आमदार भाजपच्या गोटात जाऊ नयेत यासाठी त्यांनी आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्याची जबाबदारी उचलली. जेडीएसच्या नेत्यंानी समन्वय राखण्याची जबाबदारीही सांभाळली.  

 

 पुढील स्लाईडवर वाचा, या पाच दिग्गजांनी ५५ तासांत कर्नाटकचे राजकारण फिरवले...

 

 

बातम्या आणखी आहेत...