आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिराने अब्रूवर टाकला हात; पतीला सांगितले तर, त्याने भावासह मिळून केले हे काम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरड - फतेहगड साहिबमधील कसुंबडीमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या पती आणि दिराने मिळून बेदम मारहाण करून जखमी केले. यावरून माहेरच्यांनी पोलिसांत धाव घेऊन त्यांच्या मदतीने सासरच्या जाचातून विवाहितेची सुटका केली. 

 

पीडित विवाहितेने सांगितले असे...

यानंतर जखमी विवाहितेला सरकारी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. रुग्णालयात 34 वर्षीय पीडित महिला नवदीप कौरने सांगितले की, तिचा विवाह 13 वर्षांपूर्वी कसुंबड़ीच्या दिलबाग सिंहसोबत झाला होता. दिलबाग सिंह 3 वर्षांपूर्वी लष्करातून नायक पदावरून निवृत्त झाला होता. त्याला दारूचे व्यसन आहे, ज्यामुळे नेहमी दारू पिऊन तो तिचा शारीरिक छळ करत होता.  त्याला दोन मुली आणि एक मुलगाही आहे. विवाहितेने आरोप केला की, गत शनिवारी संध्याकाळी तिचा दीर मेजरसिंगने तिच्या अब्रूवर हात टाकण्याचा प्रयत्न केला, तिने कडाडून विरोध केला आणि त्याच्या तावडीतून पळ काढून पतीला सर्व हकिगत सांगितली. परंतु दारुड्या पतीने नशेत तिच्या दिरासह मिळून उलट तिलाच बेदम मारहाण करून जखमी केले. यादरम्यान तिची सासूही सर्वकाही उभे राहू पाहत होती.

 

काय म्हणतात पोलिस?

दरम्यान, तिच्या मुलींनी धावत जाऊन शेजाऱ्यांना माहिती दिली, तिथून त्यांनी मोबाइलवरून फोन करून विवाहितेच्या माहेरी घटना कळवली. यानंतर माहेरच्यांनी तेथे धाव घेऊन पोलिसांना तक्रार दिली व पोलिसांच्याच मदतीने जखमी विवाहितेची सुटका करून तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी विवाहितेच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाची इन्फोग्राफिक माहिती....

बातम्या आणखी आहेत...