आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Firing In Celebration Of Birthday Party A Young Man Died And Two Women Injured In Alwar

Birthday पार्टीत दोन पोलिसांचा नशेत गोळीबार, मित्राच्याच डोक्यात शिरली गोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंडावर (अलवर)- मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिल्ली पोलिस दलातील दोन पोलिसांनी दारूच्या नशेत गोळीबार केला. या वेळी त्यांचेच पाय लटपटल्याने गोळी समोर उभ्या असलेल्या मित्राच्या डोक्यात शिरली. तो जागीच ठार झाला. दुर्घटनेत दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. दोन्ही हवालदार पळून गेले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील श्योपूर भडेंटा गावातील आहे.

 

दिल्लीच्या रोहिणी भागात दूध डेअरी चालवणारा सुंदर मोठ्या भावाच्या मेहुण्याच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत आला होता. त्याच्यासोबत दिल्ली पोलिस दलातील दोन हवालदार अनिल चौधरी व राजू पालीवाल हे दोघेही आलेले होते. शनिवारी रात्री वाढदिवसाचा केक कापत असताना हवालदार अनिल याने हवेत गोळीबार सुरू केला. सुंदरने त्याला रोखलेही होते. पण त्याने ऐकले नाही. दरम्यान, दुसरी गोळी चालवताना अनिलचे पाय लटपटले आणि गोळी थेट सुंदरच्या डोक्यात शिरली. दोघाही हवालदारांनी सुंदरला भिवाडी रुग्णालयात नेले. तेथून ते फरार झाले. डॉक्टरांनी सुंदरला मृत घोषित केले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...