आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - ज्यांचे बोट पकडून चालणे शिकली, ज्यांच्या खांद्यावर बसून खेळली-बागडली, त्याच घरच्यांनी पोकळ अब्रूसाठी निर्दयीपणे पोटच्या मुलीवर- बहिणीवर गोळी झाडली. एवढेच नाही, बाप-भाऊ तिला तडफडताना पाहत राहिले आणि तिचा मृत्यू होण्याआधीच तिला रात्रीतूनच खड्डा खोदून जिवंत गाडले. ही घटना यूपीच्या आंबेडकरनगरमधली आहे. एसपी संतोष मिश्रा यांच्या मते, हे प्रकरण ऑनर किलिंगचे आहे. बाप-भावाने मिळून मुलीवर गोळी झाडली आणि तिला जिवंत गाडले.
वडील-भाऊच बनले वैरी
- पोलिसांनी सांगितले, ही घटना आंबेडकरनगर जिल्ह्यातील बसहिया गावातील आहे. येथील रहिवासी दीपांजली (16) एका मुलावर प्रेम करत होती आणि घरातून विरोध असल्याने पळून गेली होती.
- जेव्हा 10 दिवसांनी ती घरी परतली तेव्हा घरच्यांनी अपमानाचा बदला घेण्यासाठी भयंकर कट रचला.
- गुरुवारी रात्रीच वडील व भाऊ विकास सिंहने दीपांजलीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि मृतदेह लपवण्यासाठी गावातील सुनसान जागेवर खड्डा खोदून तिला गाडले.
72 तासांत प्रकरणाचा उलगडा झाला, तेव्हा हकिगत ऐकून IPSची झोप उडाली...
- एसपी म्हणाले, ''दीपांजली घरातून पळून गेल्यानंतर भाऊ विकास सिंहने गावातीलच 4 जणांविरुद्ध तिच्या खुनाचा गुन्हा दाखल केला होता.''
- ''पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत 19 दिवसांनी बेपत्ता दीपांजलीला शोधून तिला तिच्या घरी पोहोचवले, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा दीपांजली घरातून गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.''
- ''चौकशीदरम्यान पोलिसांना संशय आला तेव्हा कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. यानंतर दीपांजलीचा भाऊ विकासने जे सांगितले ते ऐकून आम्हालाही धक्का बसला अन् पूर्ण रात्र मला झोप आली नाही.''
भावाने सांगितले रहस्य - जिवंतच गाडले...
- भावाने सांगितले, ''दीपांजली घरातून पळून गेल्यावर आम्हाला खूप अपमानित झाल्यासारखे वाटत होते. म्हणूनच तिचा काटा काढण्यासाठी पप्पा आणि मी मिळून तिच्यावर गोळी झाडली.''
- ''ती तडफडत राहिली आणि आम्ही तिला पाहत राहिलो. ती मेली नव्हती, पण आम्ही तिला गावाबाहेर खड्ड्यात जिवंतच गाडले.''
- पोलिसांनी आरोपी विकासने जागा दाखवलेल्या खड्ड्यातून मृतदेह हस्तगत केला, शिवाय बंदूकही हस्तगत करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. खुलासा झाल्यावर पूर्ण कुटुंब घर सोडून फरार झाले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक्समधून पूर्ण घटनाक्रम... आणि अशाच ऑनर किलिंगच्या मन सुन्न करणाऱ्या 4 घटना...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.