आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसह सासू-सासऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन प्रियकराला बोलवायची घरी, रंगेहाथ पकडल्यावर कळले सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगरूर - येथील रत्ताखेडा गावात एका विवाहितेने प्रियकरासह मिळून कुटुंबीयांच्या अन्नात झोपेचे औषध कालवले. या औषधाच्या ओव्हरडोसमुळे सासऱ्याचा मृत्यू झाला.

> कुटुंबीय आधी या मृत्यूला नैसर्गिकच समजत होते. परंतु, 10 दिवसांनी विवाहितेने आपल्या पतीच्या आणि सासूच्याही अन्नात झोपेच्या गोळ्या मिसळल्याने या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी विवाहित महिला आणि तिच्या प्रियकरावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.  

 

13 वर्षांपूर्वी झाले होते लग्न
नछतर सिंहने धर्मगड पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा लहान भाऊ मलूक सिंहचे लग्न हरियाणाच्या साधनवास गावातील सरबजीत कौरशी 13 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांचा भाऊ वेगळा राहतो. 8 मार्च रोजी त्यांचे वडील निशान सिंह नेहमीप्रमाणे रात्री झोपण्यासाठी गेले, पण दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळले. वडिलांचा मृत्यू नैसर्गिक समजून आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. 17 मार्चला वडिलांच्या निधनानंतर आम्ही गोडजेवण ठेवले होते. तिच्या मामाचा मुलगा जसवंत सिंह त्यांच्या घरीच थांबला होता. नछतर सिंह म्हणाले की, 18 मार्चच्या रात्री ते आपल्या मुलांसह खोलीत झोपले. 

> रात्री साडे 11 वाजता जसवंत सिंहने त्यांना उठवून सांगितले की, मलूक सिंहच्या खोलीत कोणीतरी अनोळखी माणूस आला आहे. याबाबत त्याने आपल्या भावजयीला विचारपूस केली तेव्हा तिने काहीही सांगायला नकार दिला. जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा बेडखाली झंडा सिंह लपलेला आढळला.

> त्याने सांगितले की, त्याचे व सरबजीत कौरचे मागच्या 3 महिन्यांपासून अवैध संबंध आहेत. यानंतर त्याने आपला भाऊ मलूक सिंह आणि आई प्रीतम कौरला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही गाढ झोपेत होते. याबाबत त्यांनी जेव्हा सरबजीत आणि तिच्या प्रियकराला खडसावले तेव्हा त्यांनी दोघांनाही झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्याचे सांगितले. यावरूनच त्यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूवर संशय निर्माण झाला.

 

दोन्ही आरोपींना अटक, गुन्हा केला कबूल
> नछतर म्हणाले, जेव्हा सरबजित आणि तिच्या प्रियकराची चौकशी केली तेव्हा सरबजितने कबूल केले की, तिने 8 मार्च रोजी आपल्या सासऱ्याला दारूतून व जेवणातून झोपेच्या जास्त गोळ्या खाऊ घातल्या होत्या. यामुळे तिच्या सासऱ्याचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली, परंतु झंडा सिंह पोलिस पोहोचेपर्यंत फरार झाला.

> पोलिसांनी तक्रारीवरून सरबजित व तिचा प्रियकर धर्मगढ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एसएचओ पलविंदर सिंह म्हणाले, याप्रकरणी विवाहितेचा प्रियकर फरार होता, परंतु आता दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाची इन्फोग्राफिक माहिती...  

बातम्या आणखी आहेत...