आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये प्रियकरासह होती पत्नी, अचानक पोहोचलेल्या पतीने केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहारनपूर (यूपी) - येथे 8 जानेवारी रोजी एका पतीने हॉटेलच्या रूममध्ये पत्नीला तिच्या प्रियकरासह रंगेहाथ पकडले. यानंतर पतीने भररस्त्यावर 1 तास गोंधळ घातला. या गोंधळात संधी साधून महिलेचा प्रियकर पळून गेला. पाहता पाहताच भलीमोठी गर्दी जमा झाली. तेवढ्यात सूचना मिळताच पोलिस पोहोचले आणि पती-पत्नीला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यादरम्यान एका व्यक्तीने या घटनेचा मोबाइलमधून व्हिडिओ शूट केला, जो आता प्रचंड व्हायरल होत आहे.  

 

लग्नानंतर माहेरीच राहू लागली होती पत्नी...
- हाशिमपुरा येथील रहिवासी सलमानचा निकाह मानकी गावातील एका तरुणीशी 14 महिन्यांपूर्वी झाला होता.
- पती सलमानचा आरोप आहे की, ''निकाहनंतर एका महिन्यानेच पत्नीला तिच्या माहेरच्यांनी परत नेले. तो तिला आणण्यासाठी अनेक वेळा गेला, पण त्यांनी तिला पाठवले नाही.''
- ''ती अभद्र काम करू लागली होती, जे तिचा भाऊ तिच्याकडून करून घेत होता. मला माहिती मिळाली की, पत्नी तिचा प्रियकर बबलूसोबत एका हॉटेलमध्ये आहे.''
- ''जेव्हा मी तेथे पोहोचलो तेव्हा स्टाफला चौकशी केली, पण ते माहिती देण्यासाठी तयार नव्हते, त्यांनी नकार दिला. मग मीच शोधून त्यांना रंगेहाथ पकडले. संधी साधून तिचा प्रियकर तिथून पळून गेला.''
- तासभर चाललेल्या गोंधळानंतर घटनास्थळी पोलिस पोहाचले आणि त्यांनी पती-पत्नीची चौकशी करून आपल्या सोबत पोलिस स्टेशनमध्ये नेले.

 

बहिणीला बळजबरी घेऊन जात होते भावजी
- दुसरीकडे, पत्नी आणि तिच्या भावाने सलमानने केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. भाऊ म्हणाला की, ''बहिणीसोबत एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो होतो. तेवढ्यात तिथे भाऊजी आले. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आणि बहिणीला तिच्या मर्जीविरुद्ध बळजबरी आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला.'' 
- स्टेशन इंचार्ज पंकज त्यागी म्हणाले, ''दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून तपास सुरू आहे. अधिक तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.''

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे फोटोज व व्हायरल होत असलेला व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...