आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज नजरानजर व्हायची; गल्लीतच जुळले प्रेम; पुढे वाचा- काय झाले या जोडप्याचे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुशबू आणि योगेश. - Divya Marathi
खुशबू आणि योगेश.

धनबाद(झारखंड) - 16 नोव्हेंबर 2017 रोजी खुशबू आपला शेजारी योगेश कुमारसोबत पळून गेली होती. 19 नोव्हेंबरला प्रियकर योगेशचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला. याच्या 51 दिवसांनी म्हणजेच 9 जानेवारी 2018 रोजी खुशबूचा जळालेला मृतदेह मामाच्या घरातील किचनमध्ये आढळला. अगोदर प्रियकर आणि आता प्रेयसीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, दोघांची प्रेमकहाणी परिसरातील त्या गल्लीत चर्चिली जात आहे, जेथे हे दोघेही एकमेकांचे शेजारी होती. दोघांनाही ओळखणारे सांगतात की, 3 वर्षांपर्यंत यांच्या प्रेमाची कुणालाही माहिती नव्हती. दोघेही खिड़कीवर येण्याचा फक्त बहाणा शोधायचे. एका नजरेसाठी दोघांचीही सारखीच तगमग व्हायची.


घरच्यांना माहिती झाली, मग 2 दिवसही सोबत राहू शकले नाहीत
- योगेशचे मित्र सांगतात की, खुशबूबद्दल तो नेहमी काही लोकांशी बोलायचा. यामुळेच फक्त काही निवडक मित्रांना सोडून यांची प्रेमकहाणीची इतर कुणालाच माहिती नव्हती. 
- योगेश आणि खुशबूने 15 नोव्हेंबर 2017 रोजी आपल्या प्रेम सर्वांसमोर जाहीर केले. दोन्ही कुटुंबांमध्ये विरोध सुरू झाला. योगेश आणि खुशबू दोघांनीही घर सोडून दिले. दोघेही पळून रांचीला पोहोचले. दोन दिवसांतच खुशबूच्या घरच्यांनी त्यांना शोधून काढले आणि तिला बळजबरी धनबादला घेऊन गेले. 

- इकडे, 16 नोव्हेंबर 2017 रोजी योगेशच्या मृत्यूची बातमी खुशबूला कळली. तिचे प्रेम- तिचे सर्वस्व असलेला योगेशचा दुग्धा येथील रेल्वे रुळावर मृतदेह पडलेला होता. योगेशच्या कुटुंबीयांनी खुशबूच्या घरच्यांवर खुनाची एफआयआर नोंदवली. याप्रकरणी खुशबूचे वडील, काका आणि आतेभाऊ तेनुघाट जेलमध्ये कैदेत आहेत.   

 

एकाकी खुशबूच्या आठवणींत योगेश होता: शेवटी तिनेही जगाचा घेतला निरोप
योगेशच्या मृत्यूनंतर खुशबू एकाकी पडली होती. योगेश आता फक्त तिच्या आठवणींतच होता. आता घराच्या खिडकीतून योगेश दिसत नव्हता. घरच्यांनी तिचे मन बदलण्याचा खूप प्रयत्न केला, यासाठी तिला बदल म्हणून मामाच्या घरी पाठवले.

दुग्धा पोलिसांच्या मते, योगेशच्या हत्येप्रकरणी खुशबू मुख्य साक्षीदार होती. बहुतेक, ती योगेशसाठी आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात होती. पोलिसांना तिची साक्ष घ्यायची होती, परंतु असे होऊ शकले नाही. 8 जानेवारी 2018 च्या रात्री खुशबूचाही संशयास्पदरीत्या मृत्यू झाला.

 

मित्र म्हणाले- एकमेकांवर जीव ओवाळून टाकायचे दोघेही...
योगेश आणि खुशबूच्या काही मित्रांशी भास्करच्या टीमने बातचीत केली. आधी तर त्यांनी काहीही बोलायला नकार दिला. ते सारखे-सारखे हेच म्हणत होते की, जे व्हायचे ते झाले. आता त्यांच्याबद्दल बोलून काय फायदा? खूप खोदून विचारल्यावर त्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दोघेही एकमेकांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते. त्यांची सकाळ दोघांच्या नजरानजरेशिवाय सुरूच व्हायची नाही. आम्ही सर्व त्यांच्या प्रेमाचा दाखला इतरांना द्यायचो. दोघेही एकमेकांना खूप समजून घेत होतो. ते एकमेकांसाठीच बनलेले होते. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रेमकहाणीचा कसा झाला शेवट, घटनेचे फोटोज व व्हिडिओही

बातम्या आणखी आहेत...