आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहाली - आँटी तुम्ही माझ्यासोबत असं का करताय... चिमुकली रडत राहिली, हात जोडत राहिली, पण आरोपी आँटी शीलाने अल्पवयीन मुलीचे काहीएक ऐकले नाही. ती म्हणाली की, तुझ्या आईबापाने मिळून माझ्या पतीचा मर्डर केला होता. तुला मारणेच माझा उद्देश आहे. यानंतर आपली मुलगी आणि दोन तरुणांकडून तिने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून चाकूने वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी सेक्टर-69 मध्ये झालेल्या या गँगरेप आणि मर्डरच्या 3 आरोपींना पकडले आहे. यात शीला, तिची मुलगी पूजा आणि साथीदार मक्खन सामील आहे. तर चौथा आरोपी रुहाण फरार झाला आहे.
चाकूने केले 13 वार...
शीलाने आपली पूजासोबत मिळून आधी बहाणा करून अल्पवयीन मुलीला सेक्टर 69च्या डंपिंग ग्राउंडमध्ये बोलावले. येथे दोघींनी त्यांचे साथीदार मक्खन दिवान आणि रुहाणकडून आधी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवला आणि नंतर सर्वांनी मिळून तिच्यावर चाकूने 13 वार केले. खुनानंतर मृतदेहाला तिथेच सोडून सर्व फरार झाले. आरोपी शीला आणि पूजा घटनेनंतर आपल्या घरी गेल्या, तर मक्खन आणि रुहाण फरार झाले होते. पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर केसचा 41 दिवसांत उलगडा केला आहे.
शीलाने हात पकडले, मुलगी पूजाने पाय पकडून घडवला गँगरेप...
चौकशीत आरोपी म्हणाले की, शीलाने अल्पवयीन मुलीचे दोन्ही हात पकडले होते आणि पूजाने दोन्ही पाय. मग रुहाण आणि मक्खनने अल्पवयीन मुलीवर गँगरेप केला. स्वत: स्त्री असूनही शीला आणि तिची मुलगी पूजाला अल्पवयीन मुलीवर बिलकुल दया आली नाही. गँगरेपनंतर चौघांनी मिळून मुलीवर चाकूने 13 वार केले. अनेक वार पोटात, पाठीवर झाले, तर काही तिच्या गुप्तांगाजवळही करण्यात आले. अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्यावरच ते थांबले आणि मग तिथून गुपचूप पळून गेले.
हॉस्पिटलच्या मागे आई-मुलगी पाहत होत्या वाट...
एसएसपी चहल म्हणाले- 9 नोव्हेंबर रोजी शीला आणि तिची मुलगी पूजा आपल्या कटानुसार दुपारी 4 वाजता सेक्टर-69 च्या मायो हॉस्पिटलच्या मागे अल्पवयीन मुलीची वाट पाहू लागल्या. ती सेक्टर-69 मध्ये एका वकिलाच्या बंगल्यात मोलकरीण म्हणून काम करत होती. ती जेव्हा तिथून जाऊ लागली तेव्हा दोघींनी बहाण्याने तिला बोलावून डंपिंग ग्राउंडकडे नेले. तेथे रुहाण त्यांची वाट पाहत होता. त्याने अल्पवयीन मुलीला पकडले आणि मक्खनलाही फोन करून बोलावले.
पतीच्या अपघाती मृत्यूला आरोपी महिला म्हणाली हत्या...
चौकशीत आरोपी शीला म्हणाली की, 2017 च्या ऑगस्ट महिन्यात तिचा पती राम निवासचा रस्ते अपघातात यूपीमध्ये मृत्यू झाला होता. राम निवासला दारूचे व्यसन होते. पतीच्या अपघातीला मृत्यूला त्याची पत्नी शीलाने सुनियोजित कट असल्याचे म्हटले. पतीच्या खुनामागे अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांचा हात असल्याचे म्हणाली. शीलाने तिच्या ओळखीचा रुहाणशी ही गोष्ट बोलून मोहालीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांचा बदला घेण्याचा कट रचला. एवढेच नाही, या कामासाठी आरोपी रुहाणलाही शीलाने ब्लॅकमेल केले. पोलिस सूत्रांनुसार, रुहाण आणि शीलाचा पती रामनिवास चांगले मित्र होते, परंतु राम निवासच्या मृत्यूनंतर शीलासोबत त्याची मैत्री झाली होती. याचा फायदा उचलत शीलाने रुहाणला आपल्या या कटात सामील केले.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या ब्लाइंड मर्डर आणि गँगरेप केसबाबत.. इन्फोग्राफिक्स व फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.